Home /News /news /

खूशखबर! 1 जानेवारीला मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार 4000 रुपये, लवकर पूर्ण करा हे काम

खूशखबर! 1 जानेवारीला मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार 4000 रुपये, लवकर पूर्ण करा हे काम

PM Kisan

PM Kisan

सरकारने पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता (PM Kisan 10th Installment) जारी करण्याची करण्याची तारीख जाहीर केली आहे. जाणून घ्या सविस्तर

    नवी दिल्ली, 23 डिसेंबर: नवीन वर्षाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी आनंददायी असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( (PM Modi) 1 जानेवारी रोजीच शेतकऱ्यांना गिफ्ट देणार आहेत. सरकारने पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता  (PM Kisan 10th Installment) जारी करण्याची करण्याची तारीख जाहीर केली आहे. 1 जानेवारी 2022 रोजी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवला जाणार आहे. शेतकऱ्यांना पाठवण्यात आला संदेश यासंदर्भात लाभार्थी शेतकऱ्यांना मेसेजद्वारे कळवण्यात आले आहे. यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजता पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत हप्ता जारी करतील. यासोबतच या दिवशी पंतप्रधान मोदी शेतकरी उत्पादक संघटनांना इक्विटी अनुदानही जारी करतील. तुम्ही या कार्यक्रमाशी दूरदर्शन किंवा pmindiawebcast.nic.in द्वारे कनेक्ट होऊ शकता. हे वाचा-Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही,तपासा आजचा दर पूर्ण करा हे काम पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना दहाव्या हप्त्याचे पैसे तेव्हाच मिळतील जेव्हा त्यांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली असेल. या योजनेत ही प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. अन्यथा तुम्हाला मिळणारा दहावा हप्ता अडकू शकतो. कशी पूर्ण कराल ई-केवायसीची प्रक्रिया? >> सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा. >> उजव्या बाजूला अनेक प्रकारचे टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला e-KYC लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा. >> त्यानंतर मागितलेले तपशील भरुन ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा हे वाचा-दुर्लक्ष न करता 31 डिसेंबर आधी ही कामे करुन घ्या, नवीन वर्षात त्रास होणार नाही कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये? ज्या शेतकऱ्यांना अद्याप 9व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकत्र येतील म्हणजेच त्यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर होतील. पण ही सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल ज्यांनी 31 ऑक्टोबरपूर्वी नोंदणी केली आहे. पात्र शेतकरी अशाप्रकारे करू शकतील नोंदणी -याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. -त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी करू शकता. -याठिकाणी 'New Farmer Registration' या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाका -कॅप्चा कोड प्रविष्ट करून तुमचे राज्य निवडा, त्यानंतरच प्रोसेस पुढे जाईल -तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील, शेतीविषयक तपशील विचारला जाईल -ही माहिती भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या