PM KISAN योजनेचा 'या' राज्यांमध्ये एकाही शेतकऱ्याला फायदा नाही

शेतकरी सन्मान योजनेंतर्गत या राज्यांमध्ये एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पोहचले नाही.

  • Share this:

शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करणारी शेतकरी सन्मान योजना सुरु झाल्यानंतर 7 मार्चपर्यंतचा अहवाल कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केला आहे. यातून काही राज्यांनी या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ झाला तर काही राज्यांमध्ये एकाही शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळाला नाही.

आसामसारख्या लहान राज्यात 80 हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.  तर उत्तर प्रदेशात 74 लाख शेतकऱ्यांना या योजनेतील पहिला हप्ता मिळाला आहे. कृषी मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीनुसार 10 राज्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा अहवाल पाठवलेला नाही.

Loading...

आंध्र प्रदेशातील 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता मिळाला असून त्या शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचा दुसरा हप्ताही लवकरच मिळेल.

पंजाबमध्ये अडीच लाख तर जम्मू काश्मीरमध्ये 3 लाख 41 हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला. याशिवाय केरळमध्ये 3.71 लाख, ओडिसात 8 लाख तर तेलंगणा आणि तामिळनाडूत प्रत्येकी 14 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला आहे.

बिहारमध्ये फक्त 72 हजार शेतकऱ्यांना PM KISAN योजनेचा लाभ झाला. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह हे बिहारचे आहेत. केंद्रीय कृषी राज्य मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या राजस्थानमध्ये एकाही शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळाला नाही.

राजस्थानच्या राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीमध्ये त्रुटी होत्या. त्या तपासल्यानंतर केवळ 27 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले होते. मात्र राज्य सरकारकडून यात दिरंगाई झाल्याने आचारसंहितेमुळे एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पोहचले नसल्याचे राधामोहन सिंह यांनी म्हटले आहे.

देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य करणाऱ्या PM KISAN योजनेचा कर्नाटकात फक्त तीन शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. संपूर्ण राज्यात फक्त 6 हजार रुपये देण्यात आले. या ठिकाणी काँग्रेसचे सरकार आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा काँग्रेसशासित राजस्थान आणि मध्य प्रदेशातील एकाही शेतकऱ्याला फायदा झाला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2019 11:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...