मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /PM KISAN: लाभ घेण्यासाठी 31ऑक्टोबरपर्यंत करा नोंदणी; मिळतील 4000 रुपये

PM KISAN: लाभ घेण्यासाठी 31ऑक्टोबरपर्यंत करा नोंदणी; मिळतील 4000 रुपये

PM Kisan

PM Kisan

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत (PM KISAN)वर्षाला तीन हप्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आणखी लाभ मिळणार आहे.

    नवी दिल्ली 27 ऑक्टोबर : शेतकऱ्यांच्या कृषी कार्यात कोणताही अडथळा येऊ नये, त्यांना आर्थिक साहाय्य मिळावं याकरता सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत (PM KISAN) वर्षाला तीन हप्त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आणखी लाभ मिळणार आहे. देशातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेअंतर्गत पैसे जमा केले जातात. या योजनेतील 10 वा हप्ता (PM KISAN Installment) येत्या 15 डिसेंबरला जमा केला जाणार आहे. सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की या वेळी शेतकऱ्यांना दुप्पट रक्कम मिळू शकते.

    मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यांत एका हप्त्याचे 2000 रुपये आणि 2000 रुपये जादा असे एकूण 4000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे.  मोदी सरकारने (Modi Government) याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण जर तो निर्णय झाला तर शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा फायदा होणार आहे.   जर तुम्हाला एकूण 4000 रुपयांचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत आपलं नाव नोंदवणं (PM KISAN Registration) आवश्यक आहे.

    या योजनेत नोंदणी करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2021 ही शेवटची तारीख आहे.  म्हणजे त्यांना 4000 रुपयांचा हप्ता मिळू शकेल. अजूनपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी या योजनेत नावच नोंदवलेलं नाही त्यांनीही आता 31 ऑक्टोबरपूर्वी नाव नोंदवलं तर त्यांना 4000 रुपये म्हणजे दोन हप्त्यांचा लाभ मिळू शकेल. तुम्ही नोंदणी करून या योजनेच्या लाभासाठी केलेला अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात 2000 आणि डिसेंबर महिन्यात 2000 रुपये मिळू शकतात. अशाप्रकारे तुमच्या बँक खात्यात थेट 4000 रुपये जमा होतील.

    या योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6000 रुपये जमा केले जातात. 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम जमा होते. सध्या देशातील 12 कोटी लहान-मोठ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे थेट जमा होत आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 1.60 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन 2 हेक्टर म्हणजे 5 एकर शेतजमीन असेल तर त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. जोताची अट सरकारने काढून टाकली आहे आणि जो आयटीआर फाईल (ITR Filing) करतो अशा शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही.

    घरबसल्या करा अशी नोंदणी

    –Google play store मध्ये जाऊन तुमच्या फोनमध्ये PMKISAN GoI Mobile App डाउनलोड करा.

    – ते उघडून NEW FARMER REGISTRATION वर क्लिक करा.

    – तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाका आणि नंतर Continue बटण दाबा.

    – आता रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये नाव, पत्ता, बँक अकाउंट डिटेल्स, आयएफएससी कोड योग्य पद्धतीने भरा.

    – आता नोंदणी अर्जात नाव, पत्ता, बँक खात्याची माहिती, IFSC कोड ही माहिती भरा.

    – नंतर सबमिट बटण दाबा. याचबरोबर तुमची नोंदणी पूर्ण झाली.

    – तुम्हाला या योजनेबद्दल काहीही माहिती हवी असेल तर तुम्ही या हेल्पलाइन नंबरवर 155261 / 011-24300606 फोन करून ती मिळवू शकता.

    First published:

    Tags: Farmer, PM Kisan