मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

जाड दिसू नये असं वाटत असेल तर कपडे घेताना 'ही' घ्या काळजी; मिळेल एकदम परफेक्ट लुक

जाड दिसू नये असं वाटत असेल तर कपडे घेताना 'ही' घ्या काळजी; मिळेल एकदम परफेक्ट लुक

आपण जाड आहोत म्हणजे सुंदर नाही आणि आपल्या आवडीचे सगळेच कपडे घालता येणार नाहीत, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. तुमच्यावर छान दिसेल अशा काही फॅशन टिप्स वाचा..

आपण जाड आहोत म्हणजे सुंदर नाही आणि आपल्या आवडीचे सगळेच कपडे घालता येणार नाहीत, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. तुमच्यावर छान दिसेल अशा काही फॅशन टिप्स वाचा..

आपण जाड आहोत म्हणजे सुंदर नाही आणि आपल्या आवडीचे सगळेच कपडे घालता येणार नाहीत, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. तुमच्यावर छान दिसेल अशा काही फॅशन टिप्स वाचा..

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर: रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांचं आपल्या आहारावर आणि हालचालींवर अजिबात लक्ष नसतं. फास्ट फूड, शारीरिक हालचालींचा अभाव आणि तणाव यांमुळे अनेक जण लठ्ठ (Fat) होत चालले आहेत. सध्या लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. लठ्ठपणामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, युरिक अॅसिड वाढणं आणि मधुमेह यांसारख्या धोकादायक आजारांचा धोका वाढतो. याशिवाय लूकही खराब होतो. विशेषतः मुलींमध्ये दिसण्याच्या बाबतीत असुरक्षितता निर्माण होते. आपण सुंदर दिसत नसल्याचं त्यांना वाटतं. अनेकदा त्यांना त्यांच्या आवडीचे कपडे घालता येत नाहीत. तुम्हाला असंच वाटत असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Fashion Tips for fat women) देणार आहोत, ज्यांच्या वापर करून तुम्ही एकदम सुंदर दिसाल. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

नेहमीच फोटो (Photo) काढताना ड्रेस आणि मेकअपव्यतिरिक्त फोटो पोझदेखील (Photo pose) महत्त्वाची आहे. योग्य पोझ दिल्यास तुम्ही एकदम सडपातळ (slim) दिसू शकता. यासाठी फोटो काढताना एक पाय दुसऱ्यासमोर ठेवा आणि कॅमेऱ्याकडे पाहा. याशिवाय थोड्या अंतरावरून फोटो काढा. फोटो काढताना पोट आत ओढा आणि हात दूर ठेवा. असं केल्यास तुमचा सुंदर फोटो येईल.

हेअरस्टाइल योग्य केली, तर तुम्ही कमाल दिसू शकता. त्यामुळे नेहमी हेअरस्टाइल निवडताना विचार करावा. अनेकदा आपण चुकीची हेअरस्टाइल निवडतो. यामुळे आपला चेहरा खूप मोठा दिसू लागतो. जाड आणि गोलाकार चेहरा असलेल्या व्यक्तींनी लेयर्ड बॅंग्स हेअरस्टाइल करावी. याशिवाय तुम्हाला शोभेल अशी हेअरस्टाइल निवडण्यासाठी यू-ट्यूबचीही मदत घेऊ शकता.

Shirt button पुरुषांच्या शर्टची बटणे उजव्या तर महिलांची डाव्या बाजूला का असतात?

अनेक मुलींना साडी (saree) नेसायला आवडतं. जाड असल्यास साडी नेसली की आपण काकूबाई दिसतो असंही अनेकींना वाटतं. त्यामुळे साडी नेसणं टाळलं जातं; मात्र योग्यरीत्या साडी नेसल्यास तुम्हीही भारी दिसाल. यासाठी साडी नेसताना नाभीच्या खाली साडी बांधायची आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे काय तर तुम्ही साडी नेसूनही बारीक दिसू शकता.

मुलींनी कितीही कपडे घेतले तरीही त्यांना ते कमीच वाटतात. जेव्हा तुम्ही कपडे खरेदी करता, तेव्हा आपल्या शरीराचा कोणता भाग जाड आहे हे लक्षात घ्या. जाड असलेल्या भागाच्या फिटिंगची काळजी घ्या. जाड भागाला योग्यप्रकारे बसेल असं फॅब्रिक निवडा. खूप सैल कपडे परिधान केल्याने तुम्ही जाड दिसाल. तसंच व्ही-नेकलाइन टॉप किंवा ड्रेस निवडा.

International Mens Day: जुन्या विचारांच्या भारतीय पुरुषांमध्ये महिलांनी अशाप्रकारे घडवून आणला बदल

लठ्ठ व्यक्तींनी काळ्या रंगाचे कपडे घातल्यास त्या बारीक दिसतात. यामुळे तुम्ही काळ्या रंगाच्या कपड्यांची निवड करू शकता. यात तुम्ही ब्लॅक बॉटमसोबत एक सुंदर डार्क टॉप घातला तर एकदम सुंदर दिसाल. योग्य कपड्यांची निवड आणि पेहरावाला साजेशी हेअरस्टाइल केल्यास तुम्हाला एकदम परफेक्ट लूक मिळू शकतो.

First published:

Tags: Fashion, Women