'उद्या पेपर आहे पब्जी खेळू नको', आईच्या ओरडण्यावर 10वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

'उद्या पेपर आहे पब्जी खेळू नको', आईच्या ओरडण्यावर 10वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पब्जी गेम खेळताना आई ओरडली. त्यामुळे 10 वीतल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

हैद्राबाद, 03 एप्रिल : पब्जी गेमसाठी किंवा पब्जी गेम खेळताना अनेकांनी आपला जीव गमावला. याच्या बातम्या तुम्ही वाचल्याही असतील. असाच एक धक्कादायक प्रकार हैद्राबादमध्ये घडला आहे. पब्जी गेम खेळताना आई ओरडली. त्यामुळे 10 वीतल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हैदराबादमधील मलकाजगिरीच्या विष्णुपुरी इथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कालाकुरी संबाशिव असं आत्महत्या केलेल्या मुलाचं  नाव आहे. तो 10वीचा विद्यार्थी आहे. कालाकुरीच्या 10वी परीक्षा सुरू होत्या. दुसऱ्या दिवशी कालाकुरीचा इंग्रजीचा पेपर होता. पण तरी कालाकुरी मोबाईलवर पब्जी गेम खेळत होता.

यावर त्याच्या आईने म्हणजेच उमादेवीने त्याला ओरडलं. आणि गेम खेळू नको असा दम भरला. यावर कालाकुरीला राग आला आणि त्याने आत्महत्या केली. यानंतर हा संपूर्ण प्रकार घरच्यांच्या लक्षात आलं. कालाकुरीच्या वडिलांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कालाकुरीचा मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

आपल्या घरातील हसत्या-खेळत्या मुलाला असं अकाली गमावल्यामुळे कालाकुरीच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या अशा जाण्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

सध्याची तरुणाई पब्जीसारख्या गेम्सच्या आहेरी गेली आहे. त्यातून आत्महत्या होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे आपल्या मुलांना अशा गेम्सपासून लांब ठेवण्याची आणि त्यांची योग्य समजूत काढण्य़ाची मोठी जबाबदारी पालकांवर आहे.

VIDEO: सुप्रिया सुळे म्हणाल्या.. 'ज्यांना एकटं राहण्याचा अभिमान आहे, त्यांना काय नाती-गोती कळणार?'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2019 02:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading