News18 Lokmat

प्लॅस्टिकच्या अंड्यांनंतर प्लॅस्टिकची साखर आणि तांदूळही !

प्लॅस्टिक अंड्यांनंतर आता बंगळुरूत प्लॅस्टिक साखरेची भीती पसरतेय. हासन शहरात एका घरात प्लॅस्टिकची साखर आढळलीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2017 09:23 PM IST

प्लॅस्टिकच्या अंड्यांनंतर प्लॅस्टिकची साखर आणि तांदूळही !

07 जून : प्लॅस्टिक अंड्यांनंतर आता बंगळुरूत प्लॅस्टिक साखरेची भीती पसरतेय. हासन शहरात एका घरात प्लॅस्टिकची साखर आढळलीये. एवढंच नाहीतर पश्चिम बंगालमध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ सुद्धा आढळले.

बंगळुरमधील हासन शहरात एक महिला आपल्या घरात चहा बनवत होती. चहा ठेवून ती काही काम करायला बाहेरच्या खोलीत गेली. परत येऊन बघते तर भांड्यातून धूर येत होता. अशीच घटना गडग आणि टुमकूरमध्येही घडली. याचे नमुने लॅबमध्ये पाठवण्यात आलेत. हासनमध्ये आता लोक साखर घेताना अधिक काळजी घेत आहे

बंगळुरूत प्लॅस्टिकची साखर सापडली. तर पश्चिम बंगालमध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ आढळून आलेत. जलपाईगुडी भागात हा प्रकार आढळून आलाय पण यामागे कोण आहे, याचा छडा अजून लागलेला नाही. याआधीही प्लॅस्टिकची अंडी असल्याची बातमी पसरली होती. मात्र, ही निव्वळ अफवा असल्याचं समोर आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 7, 2017 09:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...