मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /तुम्ही देखील पिझ्झा आणि कोल्डिंग एकत्र पिता का? तात्काळ थांबवा नाहीतर पोटाचा असा वाजेल बँड

तुम्ही देखील पिझ्झा आणि कोल्डिंग एकत्र पिता का? तात्काळ थांबवा नाहीतर पोटाचा असा वाजेल बँड

food

food

काही कारणांसाठी काही चुकीच्या घटक पदार्थांचं एकत्रित सेवन केलं जातं. याचा शरीरावर खूप मोठा दुष्परिणाम होतो व पचनाच्या तक्रारी उद्भवतात.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 26 मार्च :   जेवणाच्या व झोपण्याच्या वेळा जशा आपल्या पचनक्रियेवर परिणाम करतात, तसंच आपण कोणता आहार घेतो याचाही पचनक्रियेवर परिणाम होतो. काही पदार्थांचं एकत्रित सेवन करणं शरीरासाठी हानीकारक ठरतं. यामुळे अपचन, गॅसेस, पोटफुगी, पोटदुखी अशा समस्या निर्माण होऊ शकतात. काही वेळेस फूड इन्फेक्शनही होऊ शकतं. त्यामुळे असा विरूद्ध आहार घेणं टाळलं पाहिजे. असे कोणकोणते पदार्थ आहारात एकत्रितपणे खाणं टाळावं?

  चौरस आहार घेण्यासाठी आपण आहारात अनेक पदार्थांचा समावेश करतो. काही पदार्थांचं एकत्रित सेवन केल्यानं त्यातील अधिक पोषणमूल्यं शरीराला मिळतात. उदा. वरणभात, पोळीभाजी असे पदार्थ शरीराला फायदेकारकच असतात. मात्र काहीवेळा पदार्थांची चव वाढवण्यासाठी किंवा इतर काही कारणांसाठी काही चुकीच्या घटक पदार्थांचं एकत्रित सेवन केलं जातं. याचा शरीरावर खूप मोठा दुष्परिणाम होतो व पचनाच्या तक्रारी उद्भवतात.

  हेही वाचा - Black Grapes Benefits : ..म्हणून महाग असतात काळी द्राक्ष, फायदे वाचाल तर चक्रावून जाल!

  चीज आणि शीतपेय

  पिझ्झा हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. विशेषतः चीज पिझ्झा खूप आवडीनं खाल्ला जातो. बरेचदा पिझ्झासोबत शीतपेय प्यायली जातात. एखाद्या सेलिब्रेशनसाठी पिझ्झा आणि शीतपेय हे लोकप्रिय कॉम्बिनेशन असतं. मात्र हे पदार्थ पचवणं शरीरासाठी खूप अवघड असतं. त्यामुळे चीज असलेल्या पदार्थांसोबत शीतपेय प्यायल्यास अस्वस्थ वाटू शकतं. पोटात दुखण्याचीही शक्यता असते.

  आंबट फळं व दूध

  दूध पचायला जड असतं. दुधात लिंबू किंवा एखादं आंबट फळाचा रस टाकला तर दूध फाटतं. त्याच्या सेवनानं गॅसेस किंवा छातीत जळजळ होण्याची शक्यता असते. काही लोकांना दुधातल्या लॅक्टोजमुळेही पचनाच्या समस्या निर्माण होतात.

  जास्त प्रथिनयुक्त पदार्थ खाणं

  सकाळच्या नाश्त्याला काही जण प्रथिनयुक्त आहार घेण्याचा प्रयत्न करतात. यामुळे शरीराला तत्काळ ऊर्जा मिळते. मात्र काही वेळा जास्त प्रथिनयुक्त नाश्ता खाल्ला जातो. उदा. प्रथिनं असलेले 2 किंवा अधिक पदार्थ एकत्रित खाल्ले जातात. यामुळे पोट जड होऊ शकतं. अशा पदार्थांचं शरीरात पचन होण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं.

  जेवणामध्ये फळं

  शरीरात फळांचं पचन सहज होतं. मात्र जेवण पचण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे जेवतानाच फळं खाल्ल्यास फळांचं पचन नीट होऊ शकत नाही व ती आंबण्याची प्रक्रिया होते. यानं अपचन होऊ शकतं.

  चुकीच्या आहार पद्धतीमुळे अपचन, गॅसेसची समस्या उद्भवतेच, पण बराच काळ अशा पद्धतीनं आहार घेतल्यास शरीरावर चट्टे, अपचनाचं जुनाट दुखणं, तोंडाची दुर्गंधी याही गोष्टी घडू शकतात. आहाराच्या योग्य सवयी पोटाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत करतात.

  First published:
  top videos

   Tags: Food, Lifestyle