मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /...आणि 'तो' दुचाकीसोबत पाण्यात वाहून जाता जाता वाचला, अंगावर शहारे आणणारा मुंबईतील थरारक VIDEO

...आणि 'तो' दुचाकीसोबत पाण्यात वाहून जाता जाता वाचला, अंगावर शहारे आणणारा मुंबईतील थरारक VIDEO

कल्याण, शिळफाटा आणि कळवा परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलं आहे.

कल्याण, शिळफाटा आणि कळवा परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलं आहे.

कल्याण, शिळफाटा आणि कळवा परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलं आहे.

कल्याण, 03 ऑक्टोबर : कल्याण शीळ फाटा रोडवरील गुगली हॉटेलजवळ शुक्रवारी रात्री उशिरा मोठी जलवाहिनी फुटली. ही जलवाहिनी फुटल्यामुळे संपूर्ण पाणी रस्त्यावर आलं. अनलॉक 5 च्या टप्प्यात अनेक उद्योग आणि ऑफिस सुरू झाल्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होती. याच दरम्यान जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आलं. या पाण्याचा प्रवाह आणि वेग खूप जास्त होता. यामुळे झालेलं नुकसान दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये पाहू शकता पांढऱ्या रंगाची कार पाण्याच्या वेगानं मागे ढकलली जात आहे. यावरून पाण्याचा प्रवाह केवढा मोठा असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. अक्षरश: रस्त्याना नदीचं स्वरूप आल्याचं शुक्रवारी रात्री पाहायला मिळालं. या व्हिडीओमध्ये पुढे आणखीन एक दुचाकीस्वार अडकल्याचं दिसत आहे.

हे वाचा-हत्ती'राज'; भररस्त्यात ट्रक थांबवून लेकरा-बाळांसह कुटुंबानं केलं ऊसाचं भोजन

रस्त्याच्या मधोमध पाण्यात दुचाकीसह चालक अडकला आहे. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे दुचाकी पुढे जात नाही तर प्रवाहासोबत दुचाकी पाण्यात जात असल्याचं दिसत आहे. हा दुचाकीस्वार वाहून जाता जाता बचावला आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. तर कल्याण, शिळफाटा आणि कळवा परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलं आहे. त्यामुळे या परिसरांतील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ही जलवाहिनी कशी फुटली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

First published:
top videos

    Tags: Kalyan, Mumbai