पिंपरीतली ही 'रँचो' तयार करते वाऱ्यावर चालणारा मोबाईल चार्जर आणि बरंच काही...

आपल्याकडे संशोधनात फारसा रस घेतला जात नाही. अनेक बुद्धीमान विद्यार्थीही त्याकडे पाठ फिरवतात.

  • Share this:

संशोधन क्षेत्रात नवनवीन शोध लावून तिनं स्वत:च्या नावावर तब्बल १० पेटंट मिळवले आहेत.  सर्वसामान्यांना फायदेशीर ठरतील असे शोध तिनं लावले आहेत. त्यामुळे सध्या सर्वच स्तरातून अंकिताचं कौतुक होत आहे. एखादी छोटीशी क्लुप्तीही अनेकांसाठी किती फायदेशीर ठरू शकते  हे पिंपरी चिंचवडच्या एका तरुणीने दाखवून दिलं. या तरुणीने छोटी छोटी संशोधनं करत स्वतःच्या नावावर तब्बल 10 पेटंट मिळवली आहेत. पिंपरीतील या मराठमोळ्या तरुणीचं नाव आहे अंकिता नगरकर.

संशोधन क्षेत्रात नवनवीन शोध लावून तिनं स्वत:च्या नावावर तब्बल १० पेटंट मिळवले आहेत. सर्वसामान्यांना फायदेशीर ठरतील असे शोध तिनं लावले आहेत. त्यामुळे सध्या सर्वच स्तरातून अंकिताचं कौतुक होत आहे.
एखादी छोटीशी क्लुप्तीही अनेकांसाठी किती फायदेशीर ठरू शकते हे पिंपरी चिंचवडच्या एका तरुणीने दाखवून दिलं. या तरुणीने छोटी छोटी संशोधनं करत स्वतःच्या नावावर तब्बल 10 पेटंट मिळवली आहेत. पिंपरीतील या मराठमोळ्या तरुणीचं नाव आहे अंकिता नगरकर.

सध्याच्या वैज्ञानिक युगात दररोज नवनवीन शोध लागत असतात. अंकिता सध्या महिला रँचो म्हणून ओळखली जात आहे. अंकिताने आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी येतील अशा 10 गोष्टींच संशोधन केलं आहे. कारच्यावर लावलेलं इंडिकेटर हे अंकिताने लावलेल्या संशोधनापैकीच एक आहे. रस्त्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी हे संशोधन अत्यंत उपयोगी आहे.

अंकिताचं संशोधन इथवरचं थांबलं नाही तर तिनं केलेल्या संशोधनाची आणि तिच्या बुद्धीमत्तेची दखल थेट माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनीही घेतली. कलाम यांच्या हस्ते अंकिताचा गौरव करण्यात आला.

अंकिताने 'इनोव्हेटिव्ह स्टेपलर' चा शोध लावला. स्टेप्लर मधल्या पिना संपत आल्या की, आपल्याला कळत नाही, म्हणून अंकिताने त्या पिनांच्या शेवटी एक रंग दिला ज्यामुळे त्या पिना संपण्याआधीच आपल्याला दिसू शकतात. शिवाय पेट्रोल चोरी रोखण्यासाठी मशीनमधून येणारं पेट्रोल थेट गाडीत न जाता पारदर्शक भांड्यात येऊन तितकंच लिटर पेट्रोल आपल्याला मिळेल यासाठी अंकीताने आधुनिक पेट्रोल पंपाचं संशोधन केलं.

अंकिताने कांदा कापण्याचं आधुनिक मशिनही तयार केलं. वाऱ्यावर चालणारा मोबाईल चार्जर, भांडी धुण्यासाठी केमिकलमुक्त हर्बल उत्पादन, ग्रामीण आणि दुर्गम भागात टीव्हीवरील चित्रं स्पष्ट दिसण्यासाठी आधुनिक अँटिना, आधुनिक आणि विद्युत विरहीत व्यायामाचं यंत्र, उंच डोंगरावरुन उतरण्यासाठी गुरुत्वाकर्षण आणि त्याचा वापर करून विजेशिवाय चालणारी खुर्ची, तसंच आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या घरातील अल्युमिनियमच्या भांड्यांना पितळेचा मुलामा देऊन केलेलं  संशोधनाचं पेटंटही अंकिताच्याच नावावर आहेत.

या संशोधनाचे पेटंट आहेत अंकिताच्या नावावर-   - इनोव्हेटिव्ह स्टेपलर- स्टेपलरमधील पिन्सना वेगळा रंग दिल्यामुळे पिन्स संपण्याआधीच समजू शकतं - पेट्रोल पंपावरील चोरी रोखण्यासाठी आधुनिक पेट्रोल पंप - कांदा कापण्याचं आधुनिक मशीन - वाऱ्यावर चालणारं मोबाईल चार्जर - भांडी धुवण्यासाठी केमिकलमुक्त हर्बल उत्पादन - टिव्हीवरील चित्र स्पष्ट दिसण्यासाठी आधुनिक अँटिना - विद्युत विरहीत व्यायाम यंत्र - डोंगरावरुन उतरण्यासाठी गुरुत्वाकर्षण - विजेशिवाय चालणारी खुर्ची - अल्युमिनियमच्या भांड्यांना पितळेचा मुलामा देणारं संशोधन

या संशोधनाचे पेटंट आहेत अंकिताच्या नावावर-
- इनोव्हेटिव्ह स्टेपलर- स्टेपलरमधील पिन्सना वेगळा रंग दिल्यामुळे पिन्स संपण्याआधीच समजू शकतं
- पेट्रोल पंपावरील चोरी रोखण्यासाठी आधुनिक पेट्रोल पंप
- कांदा कापण्याचं आधुनिक मशीन
- वाऱ्यावर चालणारं मोबाईल चार्जर
- भांडी धुवण्यासाठी केमिकलमुक्त हर्बल उत्पादन
- टिव्हीवरील चित्र स्पष्ट दिसण्यासाठी आधुनिक अँटिना
- विद्युत विरहीत व्यायाम यंत्र
- डोंगरावरुन उतरण्यासाठी गुरुत्वाकर्षण
- विजेशिवाय चालणारी खुर्ची
- अल्युमिनियमच्या भांड्यांना पितळेचा मुलामा देणारं संशोधन

आपल्याकडे संशोधनात फारसा रस घेतला जात नाही. अनेक बुद्धीमान विद्यार्थीही त्याकडे पाठ फिरवतात. त्यामुळे क्षमता असूनही संशोधन क्षेत्रात काम होताना दिसत नाही. पण अंकिता मात्र त्याला अपवाद ठरली आहे. त्यामुळेच तिच्या या संशोधनाला, चिकाटीला आणि मेहनतीला सलाम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2018 08:36 PM IST

ताज्या बातम्या