S M L

'नवरा चारित्र्यावर संशय घ्यायचा,दारू प्यायला सांगायचा',आॅडिओ रेकाॅर्डकरून पत्नीची आत्महत्या

पद्मराज ढुंगणा हा एका सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.

Updated On: Aug 28, 2018 07:48 PM IST

'नवरा चारित्र्यावर संशय घ्यायचा,दारू प्यायला सांगायचा',आॅडिओ रेकाॅर्डकरून पत्नीची आत्महत्या

पिंपरी चिंचवड, 28 आॅगस्ट : चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून एका नेपाळी महिलेनं आॅडिओ रेकाॅर्ड करून आत्महत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलीये. धक्कादायक म्हणजे हा पती आपल्या पत्नीला

मित्रांसमोर दारू पिण्यासाठी जबरदस्ती करायचा अखेर त्याच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

पवित्रा पद्मराज ढुंगणा (वय ३३ ) असं या आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. त्यांच्यामागे दोन मुले, आणि मुलगी, पती असा परिवार आहे. पद्मराज ढुंगणा हा एका सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. तर मयत पवित्राही धुणे भांडी करत असे. 

पद्मराज हा सोमवारी सकाळी कामानिमित्त बाहेर गेला होता तर मुले शाळेत गेली होती. दुपारी साडे बाराच्या सुमारास तो घरी आले असता दरवाजा बंद होता. दरवाजा ठोठावून प्रतिसाद न मिळाल्याने त्याने शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता पवित्रा या फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. 

दरम्यान, पवित्रा यांच्या भावाला तिच्या मोबाईलमध्ये आत्महत्येपूर्वी केलेल्या काही व्हॉईस रेकॉर्डिंग सापडल्या. त्यामध्ये पती चारित्र्यावर संशय घेऊन छळ करत होता. तसंच मलाही दारू पिण्यास सांगत होता. त्यांच्या मित्रांनी माझाशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याने आत्महत्या केल्याचा धक्कदायक खुलासा केलाय. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

Loading...
Loading...

VIDEO : दुसरं लग्न करणाऱ्या पतीला पत्नीने आणि मुलांनी भररस्त्यावर धुतलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2018 07:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close