पिंपरी, 29 जानेवारी : मकरसंक्रातीचं औचित्य साधत आयोजित केलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात एका महिलेने चक्क NRC आणि CAA कायद्याची माहिती देणारी पुस्तिका भेट देत महिलांना अनोख वाण दिलं आहे. पिंपरी चिंचवडमधील अजमेरा कॉलनीत राहणाऱ्या विना सोनवलकर ह्या गृहिणींन ही अनोखी शक्कल लढवत NRC आणि CAA बद्दल जनजागृती करण्यासाठी केलेल्या उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
मकर संक्रातीनंतर घरोघरी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची रेलचेल सुरू असलेली पाहायला मिळते. महिलांसाठी असलेल्या ह्या कार्यक्रमात हजेरी लावली की एक भेट वस्तू देण्याची प्रथा आहे. ज्याला वाण असं म्हटलं जातं. अशा भेट वस्तू स्वीकारण्यासाठी महिला एकमेकींच्या घरी जातात.
...म्हणून अजित पवार यांना घाबरण्याचं कारण नाही, भाजप खासदाराचा कार्यकर्त्यांना मंत्र
अशाच कार्यक्रमाचं आयोजन पिंपरी चिंचवड मधील अजमेरा कॉलनीत राहणाऱ्या सोनवलकर यांनी केलं आणि त्यांनी वाण म्हणून महिलांच्या ओटीत चक्क NRC आणि CAA कायद्याची माहिती देणारी पुस्तिका टाकली. तेव्हा येणाऱ्या महिलाही भारावून गेल्या होत्या.
Published by:Akshay Shitole
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.