आत्महत्येच्या सत्राने पिंपरी चिंचवड हादरलं, उच्चशिक्षित महिलेसह 3 जणांनी संपलं जीवन

आत्महत्येच्या सत्राने पिंपरी चिंचवड हादरलं, उच्चशिक्षित महिलेसह 3 जणांनी संपलं जीवन

एकाच दिवशी घडलेल्या आत्महत्येच्या तीन घटनांनी पिंपरी चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 19 जून : वाकड परिसरात एकाच दिवशी वेग-वेगळ्या घटनेत एका आय.टी. अभियंत्यासह एकूण तीन जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एकाच दिवशी घडलेल्या आत्महत्येच्या तीन घटनांनी पिंपरी चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे.

आय.टी.अभियंता असलेल्या प्रशांत सेठ राहत्या घरात गळफास लावून तर तनिका शर्मा या उच्चशिक्षित महिलेने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं. तसंच तिसऱ्या घटनेत गेनदेव काशीद यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या तीनही घटनांचा तपास वाकड पोलीस करत आहेत. 

दरम्यान, वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल दिवसभरात आणखी एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र सतर्कतेमुळे आत्महत्या करण्यापासून संबधित व्यक्तीला रोखण्यात पोलिसांना यश आलं.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथे आणखी एक जण आत्महत्या करत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वाकडचे गस्तीवरील पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नात असणाऱ्यास ताब्यात घेतले असता तीन महिन्यानपासून बायको मुलं माहेरी गेल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

पुण्यातही कुटुंबाने केली आत्महत्या

एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार वाघजाईनगर इथे घडला. अतुल दत्तात्रय शिंदे यांनी आपल्या पत्नी आणि दोन चिमुकल्यांसह राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं. हा टोकाचा निर्णय घेण्यामागचं कारण आर्थिक विवंचना होतं का याचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी घरामध्ये पोलिसांना सुसाईट नोट सापली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी कोणालाही जबाबदार धरू नये. आम्ही आमच्या मर्जीनं आत्महत्या करत आहोत असं पेन्सिलिनं भिंतीवर लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना घटनास्थळावर मिळाली आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 19, 2020, 11:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading