तूरबंदीविरोधात शेतकऱ्यांची कोर्टात धाव, 2 मे रोजी सुनावणी

तूरबंदीविरोधात शेतकऱ्यांची कोर्टात धाव, 2 मे रोजी सुनावणी

या प्रकरणी येत्या 2 मे रोजी पुढील सुनावणी होईल.

  • Share this:

26 एप्रिल : राज्यभरात तूरबंदीमुळे शेतकरी हवालदील झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही त्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या आहेत. अखेर तूर प्रश्नी शेतकऱ्याने कोर्टाची पायरी चढलीये.

तूर खरेदी थांबवण्याच्या निर्णयाविरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात शेतकऱ्यांनी धाव घेतलीय. तूर खरेदीबाबत शासनानं शेतकऱ्यांची फसवणूक केली असून ताबडतोब तूर खरेदी केंद्र सुरू करून राहिलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आलीय. या प्रकरणी येत्या 2 मे रोजी पुढील सुनावणी होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2017 07:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading