VIDEO : दो चुटकी सिंदूर की कीमत ....! गावागावात फिरणारं ट्रकवरचं फाइव्ह स्टार थिएटर

VIDEO : दो चुटकी सिंदूर की कीमत ....! गावागावात फिरणारं ट्रकवरचं फाइव्ह स्टार थिएटर

मोठ्या शहरांमध्ये आपण वीकेन्डला अनेक वेळा मॉलमध्ये जाऊन नव्याने रिलीज झालेली फिल्म पाहतो पण छोट्याछोट्या खेड्यांमध्ये किंवा अगदी छोट्या शहरांमध्येही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या एखाद्या आरामशीर थिएटरमध्ये जाता येतच नाही. पण आता तेही शक्य झालं आहे, 'पिक्चर टाइम' मध्ये.

  • Share this:

मुंबई, 13 जुलै : दो चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो, तारीख पे तारीख, ये ढाई किलो का हाथ, मोगॅम्बो खुश हुआ हे सगळे डॉयलॉग भारतभरात हिट आहेत. लोकांनी हे चित्रपट पाहिले नसतील तरी या डायलॉगची क्रेझ मात्र प्रत्येकाला असते. मग ती मेट्रोसिटी असो किंवा डोंगरात लपलेलं एखादं छोटंसं गाव असो. प्रत्येक ठिकाणी 'फिल्म दिवाने' लोक भेटतातच.

मोठ्या शहरांमध्ये आपण वीकेन्डला अनेक वेळा मॉलमध्ये जाऊन नव्याने रिलीज झालेली फिल्म पाहतो पण छोट्याछोट्या खेड्यांमध्ये किंवा अगदी छोट्या शहरांमध्येही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या एखाद्या आरामशीर थिएटरमध्ये जाता येतच नाही. पण आता तेही शक्य झालं आहे, 'पिक्चर टाइम' मध्ये.

पिक्चर टाइम या चालत्याफिरत्या थिएटरची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे सुशील चौधरी म्हणतात, गावामध्ये रोटी, कपडा, मकान याच गोष्टींबद्दल लोक सारखं बोलत असतात. पण गावकऱ्यांना एंटरटेनमेंटचीही तेवढीच गरज आहे हे कुणी लक्षातच घेत नाही. त्यामुळे मी हे ट्रकवर गावागावांत फिरणारं थिएटर काढलं.

हे ट्रकवरचं थिएटर तंबूसारखं गावात जिथे जाऊ तिथे उभं करता येतं. हे तंबूसारखं दिसत असलं तरी मल्टीप्लेक्स थिएटरसारखंच अत्याधुनिक आहे. या थिएटरमध्ये एसी बसवता येतो. त्यात डिजिटल प्रोजेक्शन सराउंडींग साउंड सिस्टीमही आहे. इथली आसनव्यवस्था पण मल्टीप्लेक्ससारखी आरामदायी असते. यात आगप्रतिबंधक यंत्रणाही आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या सुरक्षेची काळजीही घेण्यात आलीय.

VIDEO : हेमा मालिनींनी लोकसभेच्या आवारात घेतला झाडू हाती!

एवढ्या सगळ्या पॉश थिएटरमध्ये जायचं तिकीट किती असेल ? मल्टीप्लेक्समध्ये आपण 300 ते 500 रुपयांचं तिकीट घेतो पण या गावातल्या 'पिक्चर टाइम'चं तिकीट आहे, 25 ते 30 रुपये !

या थिएटरमध्ये एंटरटेनमेंट फिल्म दाखवल्या जातातच पण त्याचसोबत सामाजिक प्रबोधनाच्याही छोट्या फिल्मही दाखवल्या जातात.

सध्या 'पिक्चर टाइम'ची 37 थिएटर्स गावागावांत फिरत आहेत. ही संख्या 120 करण्याचा सुशील चौधरी यांचा विचार आहे. म्हणजे त्यांना एका दिवसात 12 लाख लोकांपर्यंत पोहोचता येईल.

=============================================================================================

VIDEO : रस्त्यावर टिक-टॉक व्हिडिओ बनवताय तर पोलीस करू शकता कारवाई!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2019 06:26 PM IST

ताज्या बातम्या