Home /News /news /

भारत-पाक सीमेवर हातात बंदुक घेऊन दिसला ‘धोनी’, जवानांसोबत PHOTO VIRAL

भारत-पाक सीमेवर हातात बंदुक घेऊन दिसला ‘धोनी’, जवानांसोबत PHOTO VIRAL

नीला सैन्यात जाण्याची इच्छा होती. त्याला सैन्याकडून मानद लेफ्टनंट कर्नल पद बहाल करण्यात आलं आहे. तो एकदा म्हणाला होता की, माझं देशावर आणि त्यानंतर कुटुंबीय आणि मग पत्नी.

नीला सैन्यात जाण्याची इच्छा होती. त्याला सैन्याकडून मानद लेफ्टनंट कर्नल पद बहाल करण्यात आलं आहे. तो एकदा म्हणाला होता की, माझं देशावर आणि त्यानंतर कुटुंबीय आणि मग पत्नी.

निळ्या जर्सीमध्ये मैदानावर क्रिकेट खेळतानाचे नाही तर, सैन्याच्या गणवेशात हातात बंदुक घेतलेल्या धोनीचे एका जवानासोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत.

    नवी दिल्ली, 29 जानेवारी : कूल धोनी मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर, पण क्रिकेटप्रेमींमध्ये त्याचीच चर्चा रंगते. आता पुन्हा एकदा एम.एस. धोनी चर्चेत आला आहे तो त्याच्या व्हायरल फोटोंमुळे... धोनीचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आणि फॅन्समध्ये एकच चर्चा रंगली. आता तुम्ही विचार करात असाल धोनीचे क्रिकेट सरावाचे, झिवासोबत खेळतानाचे किंवा साक्षीसोबत हॉलिडे एन्जॉय करतानाचे फोटो व्हायरल झाले असतील. पण जरा थांबा, यावेळी धोनीचे फोटो क्रिकेटच्या जर्सीमध्ये मैदानावर खेळतानाचे नाही तर, सैन्याच्या गणवेशात एका जवानासोबतचे फोटो आहेत. सैन्याचा गणवेश घातलेला आणि बंदुक हाती घेतलेला धोनीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. काश्मीरमध्ये ट्रेनिंग घेतानाचा फोटो काश्मीरमध्ये ट्रेनिंग घेत असतानाचा हा फोटो असल्याचा सांगितला जात आहे. वर्ल्डकपनंतर धोनीने क्रिकेटमधून काही वेळ विश्रांती घेतली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातील 15 दिवस धोनी भारतीय सैन्यासोबत वेळ घालवत होता. लेफ्टिनेंट कर्नल धोनीने 106व्या टेरिटोरियल आर्मी बटालियनसोबत ट्रेनिंग घेतली होती. यावेळी गार्ड, पोस्ट ड्युटी आणि पेट्रोलिंग धोनीने केली होती. दरम्यान, धोनीने 15 ऑगस्ट रोजी धोनीने लडाखमध्ये तिरंगाही फडकावला होता. टीम इंडियात धोनीचा समावेश नाही इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वर्ल्डकपनंतर धोनी टीम इंडियामधून बाहेर आहे. धोनीने अखेरचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. यानंतर झालेल्या वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया मालिकेमध्येही धोनी खेळला नाही. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या टी20 आणि वनडे मालिकेमध्येही धोनीचा समावेश करण्यात आला नव्हता. IPL मधून करणार कमबॅक? धोनी IPL मधून पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवणार असल्याची माहिती आहे. धोनी IPLच्या माध्यमातून कमबॅक करणार आहे. धोनीचा IPL परफॉर्मन्स चांगला राहिला तर, टीम इंडियामध्ये त्यांची जागा निश्चित होण्याची शक्यता अधिक आहे. तज्ज्ञांच्या मते, ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या टी20 वर्ल्डकपपर्यंत धोनी खेळू शकतो. तर, माजी क्रिकेटपटूंच्या मते, धोनीचं आता आंतरराष्ट्रीय करिअर संपुष्टात आलं आहे. परंतु, धोनीनं यावर अद्याप कोणतंही विधान केलं नसल्यानं धोनीच्या निवृत्ती कधी घेणार, हे काळच सांगेल.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Cricket, Team india

    पुढील बातम्या