Photograph Movie Trailer- 'तुम ठिक हो... मैं भी ठिक हूं...'

Photograph Movie Trailer- 'तुम ठिक हो... मैं भी ठिक हूं...'

'फोटोग्राफ' सिनेमात दोन परस्पर विरुद्ध आणि अनोळखी लोकांच्या प्रेमाची कहाणी सांगण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, १९ फेब्रुवारी २०१९- रितेश बत्रा दिग्दर्शित 'फोटोग्राफ' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रा यांची मुख्य भूमिका या सिनेमात आहे. 'फोटोग्राफ' सिनेमात दोन परस्पर विरुद्ध आणि अनोळखी लोकांच्या प्रेमाची कहाणी सांगण्यात आली आहे. नवाज गेट वे ऑफ इंडियाकडे फोटो काढून उदरनिर्वाह करणारा एक सर्वसामान्य माणूस असतो तर सान्या ही सीएची विद्यार्थिनी असते.

अचानक दोघं गेट वे ऑफ इंडिया इथे भेटतात आणि अप्रत्यक्षपणे एकमेकांच्या प्रेमात पडतात. सिनेमाची कथा फार वेगळी आहे, याचमुळे अनेकांना नवाज आणि सान्याची ही अनोखी प्रेम कहाणी भावत आहे. ट्रेलर पाहून अनेकांमध्ये सिनेमा पाहण्याची उत्सुकता दिसून येते.

निर्मात्यांच्या मते, ही एका स्ट्रगल करणाऱ्या फोटोग्राफरची गोष्ट आहे. हा फोटोग्राफर मुंबईत राहत असतो आणि त्याची आजी त्याच्यावर लग्न करण्याची जबरदस्ती करत असते. याच दरम्यान त्याची भेट नुरीशी (सान्या मल्होत्रा) होते आणि सहज त्यांच्यात प्रेम बहरत जातं.

'फोटोग्राफ' सिनेमाचे दिग्दर्शक रितेश बत्रा यांनी याआधी 'लंच बॉक्स' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा अनेकांच्या पसंतीस पडला होता. 'फोटोग्राफ' सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा सिनेमा दाखवण्यात आला आहे. येत्या १५ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होईल.

VIDEO : शिवरायांची भव्यदिव्य रांगोळी साकारणाऱ्या सौंदर्यासाठी आई-वडिलांनी दागिने ठेवले गहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2019 11:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading