• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • हिजाब न घालता सोशल मीडियावर शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट !

हिजाब न घालता सोशल मीडियावर शेअर केला फोटो; विद्रोहींनी केलं अपहरण, आता व्हर्जिनिटी टेस्ट !

मॉडलचं वय 20 वर्षे असून तिचं नाव यमनी इंतिसार अल-हम्मादी आहे. होता विद्रोहींनी तिच्यावर हिजाबाशिवाय काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप केला आहे

 • Share this:
  सना, 9 मे : यमनमध्ये हुती विद्रोहींनी एका मॉडेलचं अपहरण केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मॉडलचं वय 20 वर्षे असून तिचं नाव यमनी इंतिसार अल-हम्मादी आहे.  होता विद्रोहींनी तिच्यावर हिजाबाशिवाय काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप केला आहे आणि चारित्र्यांचा प्रश्न उपस्थित करीत अपहरण केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हूती विद्रोही त्या मॉडेलची व्हर्जिनिटी टेस्ट करण्याची तयारी करीत आहे. यानंतर ते त्याच्या सुटकेचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. एमनेस्टी इंटरनॅशनने व्यक्त केली टे्टची शक्यता रॉयटर्सनी एमनेस्टी इंटरनॅशनलच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार हिजाबशिवाय फोटो काढल्यामुळे इरानचे समर्थित हूती विद्रोहींकडून अपहरण केलेल्या 20 वर्षीय मॉडेलची जबरदस्तीने व्हर्जिनिटी टेस्ट केली जाऊ शकते. यमनी इंतिसार अल-हम्मादी हिचं फेब्रुवारी महिन्यात राजधानी सनामध्ये एका चेकपॉइंटवर अपहरण करण्यात आलं होतं. हा चेकपॉइंट हूती विद्रोहींच्या भागात येतो. झी न्यूजने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे ही वाचा-रस्त्यावर पडलेल्या सेक्स टॉयला समजली ग्रेनेड बॉम्ब; परिसरात उडाला गोंधळ अपहरण केलेल्या मॉडेलवर हूती विद्रोहींनी अनेक आरोप लावले आहे. त्यांनी मॉडेलवर अश्लील कृत्य करणे आणि इस्लामिक सिद्धांताविरुद्ध जाण्याचा आरोप लावला होता. आरोपांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अल-हम्मादी नियमित रूपात सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करीत होती. जे इस्लामिक दृष्टीने चुकीचं असल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्टनुसार मॉडेलवर दबाव आणत अनेक गुन्ह्यांची कबुली करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती. हूती विद्रोहींच्या नावे आधारहिन आरोपांवर लोकांना मनमानी पद्धतीने अटक करण्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. याशिवाय हूती विद्रोही आपल्या विरोधकांना अत्यंत दुर्देवी पद्धतीने हत्या केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

  Published by:Meenal Gangurde
  First published: