Home /News /news /

'साहो'च्या सेटवरून लीक झाला प्रभास- श्रद्धाचा फोटो, सोशल मीडियावर व्हायरल

'साहो'च्या सेटवरून लीक झाला प्रभास- श्रद्धाचा फोटो, सोशल मीडियावर व्हायरल

'बाहुबली'नंतर माझा हा दुसरा अॅक्शनपट आहे. मला वाटतं की लोकांना मी अॅक्शनपटांमध्ये जास्त आवडतो.

    मुंबई, १५ एप्रिल- 'बाहुबली' सिनेमामुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार प्रभासच्या आगामी 'साहो' सिनेमाबद्दल देशभरातील त्याच्या चाहत्यांमध्ये कमालिची उत्सुकता आहे. साहो सिनेमातील अॅक्शन सीनने आधीच प्रेक्षकांना स्वतःकडे आकर्षित केले आहे. आता सिनेमाच्या सेटवरून प्रभास आणि श्रद्धाचा एक फोटो लीक झाला आहे. फोटोमध्ये दोघांची केमिस्ट्री फार सुंदर आहे. या सिनेमात प्रभाससोबत बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त या दोघांच्या फोटोचीच चर्चा आहे. यात दोघं एकमेकांकडे फार रोमॅण्टिक पद्धतीने पाहत आहेत. या सिनेमातून श्रद्धा तेलगू सिनेमात पदार्पण करणार आहे. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये श्रद्धा फार सुंदर दिसतेय. सायना नेहवालच्या बायोपिकमुळे श्रद्धा चर्चेत होती. या सिनेमासाठी सुरुवातीला श्रद्धाला साइन करण्यात आले होते. मात्र अचानक श्रद्धाने यातून काढता पाय घेतला अखेर हा सिनेमा परिणीती चोप्राकडे गेला. साहो सिनेमा ८० टक्के पूर्ण झाला असून शेवटच्या टप्प्यातलं चित्रीकरण सुरू आहे. मिड- डेला दिलेल्या मुलाखतीत प्रभास म्हणाला की, ‘बाहुबलीनंतर माझा हा दुसरा अॅक्शनपट आहे. मला वाटतं की लोकांना मी अॅक्शनपटांमध्ये जास्त आवडतो.’आता 'साहो' सिनेमा लोकांना किती आवडतो हे तर येणारा काळच सांगेल. हा सिनेमा तेलगूशिवाय हिंदी आणि तमिळ भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहे. सिनेमात जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, नील नितीन मुकेश, मंदिरा बेदीसह अनेक बॉलिवूड स्टार आहेत. येत्या १५ ऑगस्टला 'साहो' सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे.
    First published:

    Tags: Prabhas

    पुढील बातम्या