...जेव्हा मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये रवी शास्त्री दिसतात

...जेव्हा मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये रवी शास्त्री दिसतात

शास्त्री यांच्या चेहऱ्याशी साम्य असणाऱ्या या व्यक्तीचं नाव अजूनपर्यंत कळलं नाही. मात्र त्यांच्या फोटोमुळे सध्या ट्विटरवर लोक रवी शास्त्री यांना ट्रोल करत आहेत

  • Share this:

मुंबई, ०६ नोव्हेंबर- मुंबईच्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाश्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचे झाले असे की त्या व्यक्तिचा चेहरा भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी मिळता जुळता आहे.

शास्त्री यांच्या चेहऱ्याशी साम्य असणाऱ्या या व्यक्तीचं नाव अजूनपर्यंत कळलं नाही. मात्र त्यांच्या फोटोमुळे सध्या ट्विटरवर लोक रवी शास्त्री यांना ट्रोल करत आहेत.

ट्विटरवर डीजे नावाच्या एका व्यक्तीने शास्त्री यांना ट्रोल करत म्हटले की, ‘जेव्हा बीसीसीआय तुम्हाला प्रवास भत्ता देत नाहीत…’ तर दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, ‘जेव्हा विराट कोहली त्याच्या पार्टीत रवी शास्त्रींना बोलवायला विसरला...’

तर तीसमार खान नावाच्या व्यक्तिने मुंबईतल्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या या व्यक्तीचा फोटो आणि शास्त्रींचा ऑडीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘वर्ल्ड कप २०१९ च्या आधी रवी शास्त्री आणि वर्ल्ड कप २०१९ नंतरचे रवी शास्त्री.’ सोशल मीडियावर यासंबंधी अजूनही अनेक कमेंट आल्या आहेत.

First published: November 6, 2018, 4:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading