पीएफ आता फक्त 5 दिवसात काढता येणार !

पीएफ आता फक्त 5 दिवसात काढता येणार !

तुमचं आधार कार्ड ईपीएफ खात्याशी कनेक्ट असेल तर तुम्हाला पीएफची रक्कम अवघ्या 5 दिवसात काढता येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : तुमचं आधार कार्ड ईपीएफ खात्याशी कनेक्ट असेल तर तुम्हाला पीएफची रक्कम अवघ्या 5 दिवसात काढता येणार आहे. फक्त त्यासाठी तुमचा ईपीएफओ नंबर आणि आधार कार्ड नंबर हे दोन्हीही ऑनलाईन कनेक्ट असणं आवश्यक आहे.

केंद्रीय प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाचे आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी यासंबंधी प्रादेशिक कार्यालयांना यासंबंधीचे निर्देश पाठवलेत. या निर्णयामुळे 'आधार लिंक' प्रक्रियेला चालना मिळेल, असंही ईपीएफ कार्यालयाने म्हटलंय.

एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यानंतर पीएफ काढण्यासाठी त्याला अनेकदा पीएफ कार्यालयाचे खेटे मारावे लागत होते. पण आता तुमचा 'आधार' नंबर पीएफ कार्यालयाशी जोडलेला असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करूनही पीएफची रक्कम तात्काळ काढू शकता...फक्त त्यासाठी तुमच्या बँक खात्याचं 'केवायसी' पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे.

First published: July 10, 2017, 6:07 PM IST

ताज्या बातम्या