मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /पेट्रोलसाठी चलो गुजरात! महाराष्ट्रात शंभरी पार केल्याने वाहनधारक पेट्रोलसाठी ओलांडतात राज्याची सीमा

पेट्रोलसाठी चलो गुजरात! महाराष्ट्रात शंभरी पार केल्याने वाहनधारक पेट्रोलसाठी ओलांडतात राज्याची सीमा

(People going to Gujrat to fill petrol tanks वाहनाची पेट्रोलची टाकी फुल भरली तर 100 रुपयांची बचत होत असल्याचे वाहनधारक सांगत आहेत. मोठ्या वाहनांमध्ये तर अधिक पैसे वाचतात.

(People going to Gujrat to fill petrol tanks वाहनाची पेट्रोलची टाकी फुल भरली तर 100 रुपयांची बचत होत असल्याचे वाहनधारक सांगत आहेत. मोठ्या वाहनांमध्ये तर अधिक पैसे वाचतात.

(People going to Gujrat to fill petrol tanks वाहनाची पेट्रोलची टाकी फुल भरली तर 100 रुपयांची बचत होत असल्याचे वाहनधारक सांगत आहेत. मोठ्या वाहनांमध्ये तर अधिक पैसे वाचतात.

नंदुरबार, 04 जून : आधीच कोरोनाचं संकट (Corona Crisis) आणि त्यात वाढत चाललेली महागाई (inflation) यामुळं सामान्य नागरिक मेताकुटीला आला आहे. महागाईसाठी इंधनाचे वाढणारे दर (Fuel rate hike) सर्वाधिक कारणीभूत ठरतात. महाराष्ट्रात तर पेट्रोलच्या दरानं (Petrol Rate) शंभरीही पार केली आहे. त्यामुळं त्रस्त झालेले नागरिक चलो गुजरात म्हणत थेट राज्याची सीमा ओलांडताना दिसत आहेत. गुजरात सीमेवरील महाराष्ट्रातील अनेक नागरिक पेट्रोल भरण्यासाठी चक्क गुजरात राज्यात जात आहे. त्यामुळं याठिकाणी पेट्रोल पंपांवर महाराष्ट्राच्या नागरिकांची गर्दी दिसतेय. (People going to Gujrat to fill petrol tanks)

(वाचा-सावधान! पुण्यात सोशल मीडियातून हनीट्रॅपमध्ये अडकवल्याच्या 150 तक्रारी दाखल)

पेट्रोलचे दर किंवा इंधनाचे दर हे सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. त्याचं कारण म्हणजे रोज यावर खर्च करताना त्यांना महागाईची जाणीव होत असते. त्यामुळं महाग झालेलं पेट्रोल हे सर्वाधिक काळजीचं कारण सर्वसामन्यांसाठी ठरतं. महाराष्ट्रात तर पेट्रोलनं शतक केव्हाच पूर्ण केलं आहे. पण महाराष्ट्राच्या तुलनेत आपल्या शेजारी गुजरात राज्यात पेट्रोलचे दर कमी आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील वाहनधारक गुजरात राज्यात पेट्रोल भरण्यासाठी जात आहेत. नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र व गुजरात सीमावर्ती भागात आहे.

(वाचा-Mumbai : ड्रग्जची देशातील सर्वात मोठी सप्लायर अटकेत, 3 कोटींचे ड्रग्ज जप्त)

गुजरातच्या हद्दीमध्ये असलेल्या पेट्रोल पंपांवर पेट्रोलचे दर प्रतिलीटर 93.73 पैसे एवढे आहेत. दुसरीकडं महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर 101 रुपये म्हणजेच शतक पार केलेले आहेत. नंदुरबार पासून अवघ्या 12 किलोमीटरवर असलेल्या गुजरातच्या सीमेतील पेट्रोल पंपावर स्वस्त पेट्रोल मिळत आहे. त्यामुळं या भागातील काही नागरिक पेट्रोल भरण्यासाठी चक्क महाराष्ट्रातील पेट्रोल पंप ओलांडून गुजरात राज्यात पेट्रोल पंपावर गर्दी करताना दिसत आहेत.

महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील पेट्रोलच्या दरामध्ये साधारणपणे लीटरमागं 8 ते 9 रुपयांची तफावत आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील वाहनधारक गुजरात मध्ये पेट्रोल भरण्यासाठी जातात. वाहनाची पेट्रोलची टाकी फुल भरली तर 100 रुपयांची बचत होत असल्याचे वाहनधारक सांगत आहेत. मोठ्या वाहनांमध्ये तर अधिक पैसे वाचतात. त्यामुळं दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणत किमान होते तेवढी बचत करण्यासाठी हे नागरिक आता रोज पेट्रोलसाठी महाराष्ट्रातून गुजरातला जाऊन येत आहेत.

First published:
top videos

    Tags: Gujrat, Maharashtra News, Petrol and diesel price