...तर पेट्रोल पंपाला बसतील टाळे!

...तर पेट्रोल पंपाला बसतील टाळे!

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : नाशिकमध्ये जिल्ह्यात पेट्रोलनं नव्वदी पार केलीय. पेट्रोलच्या दरानं जर शंभरी गाठली तर पेट्रोल पंपावरील युनिट बदलण्याची पाळी येणार आहे. अनेक मशीनवर पैशाच्या स्वरूपात आकडे पाच डिजिटमध्ये दिसू शकत नाही. तर बहुतांश पेट्रोल पंपावर नवीन डिजिटल मशीन असल्यानं ही समस्या उद्भवणार नाही असं पेट्रोलपंप चालकांना वाटतं.

अवघ्या महाराष्ट्रात सध्या पेट्रोल डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्यात. सोमवारी पेट्रोलचे दर प्रति लीटर 89.44 रुपये झाले तर रविवारी ते 89.29 रुपये होतं. डिझेल 17 पैशांनी वाढून 78.33 रुपये प्रति लीटरवर गेलं. पण राज्याच्या इतर शहरांच्या तुलनेत इंधन किंमती नांदेडमध्ये सर्वाधिक आहेत.

वाहतूक खर्चामुळे काही शहरांमध्ये इंधन किंमती मुंबईपेक्षा अधिक आहेत. माध्यमांच्या अहवालानुसार, यात परभणी, नंदुरबार, नांदेड, लातूर, जळगाव, बीड, औरंगाबाद आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहेत. इथं पेट्रोल 90 रुपयांपेक्षा जास्त आहे.

इंधन दरवाढीचा फटका पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या कापरालाही बसला आहे. पेट्रोलचे दर वाढल्याने पंधरा दिवसापूर्वी 400 रुपये किलो असलेल्या कापराचे दर वाढत जाऊन बाराशे रुपयांवर पोहोचले आहे. कापूर हा ज्वलनशील पदार्थ म्हणून ओळखला जातो. तो बनवताना त्यामध्ये पेट्रोलजन्य पदार्थाचा वापर करण्यात येतो.

कापूर हा ज्वलनशील पदार्थ म्हणून ओळखला जातो. तो बनवताना त्यामध्ये पेट्रोलजन्य पदार्थाचा वापर करण्यात येतो. या वापरामुळेच कापराचा हवेशी संपर्क येताच त्याची घनता कमी होत नष्ट होतो. एक महिन्याभरापूर्वी या कापराचा दर ४०० रुपये किलो होता. पण गेल्या पंधरा दिवसांपासून रुपयाचे अवमूल्यन होतं इंधनाचे दर जसे भडकू लागले, तसे त्याचे परिणाम पेट्रोलजन्य अन्य पदार्थाच्या दरावरही दिसू लागले आहेत.

 

Ind vs Pak: गांगुलीची दादागिरी तर सचिनचे ‘विराट’स्वरूप, हे आहेत पाकविरुद्धचे तगडे रेकॉर्ड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2018 11:49 AM IST

ताज्या बातम्या