मुंबई, 15 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीचं सत्र सुरूच आहे. पेट्रोलच्या दरात आज 34 पैशांनी वाढ झालीये तर डिझेलच्या दरातही वाढ झालीये. मुंबईत आज पेट्रोल 89 रुपये 1 पैशांवर गेलंय. तर डिझेलचा दर 78 रुपये 7 पैशांवर गेलंय. या दरवाढीमुळे सर्वसामान्य मात्र आता पुरता वैतागला आहे.
पण दरम्यान, इतर देशांमध्ये इंधनाचे दर सर्वसामान्यांना परवडतील असेच आहेत. पाहूयात इतर देशांमध्ये सध्या पेट्रोलचे दर किती आहेत ते...
देश पेट्रोल डिझेल
- पाकिस्तान 65.20 61.56
- श्रीलंका 69.09 51.90
- नेपाळ 71.25 59.43
- चीन 78.95 70.49
- ब्रिटन 119 121.80
पाहूयात महाराष्ट्रात पेट्रोलची किंमत कशी ठरते ते..
- तेल कंपन्या कितीला विकतात - 48 रु.
- अबकारी कर - 19.48 रु.
(केंद्र सरकार)
- व्हॅट - 18.97 रु.
(राज्य सरकार)
- डीलरचं कमिशन - 3.60 रु.
पाहूयात गेल्या 15 वर्षांमध्ये पेट्रोल कसं वाढत गेलं ते...
16 एप्रिल 2003 - केवळ 37 रुपये 25 पैसे
20 जून 2005 - 45.93
05 जून 2006 - 53.50
16 मे 2007 - 48.38
24 मे 2008 - 50.54
02 जुलै 2009 - 48.76
27 फेब्रुवारी 2010 - 51.68
01 एप्रिल 2010 - 52.20
15 मे 2011 - 68.33
24 मे 2012 - 78.57
23 मे 2013 - 71.13
07 जून 2014 - 80.11
16 मे 2015 - 74.12
17 मे 2016 - 66.12
16 मे 2017 - 76.55
29 मे 2018 -86.24
15 सप्टेंबर 2018 - 89.01
जगातले ५ देश जे पेट्रोल- डिझेल वापरत नाहीत