पेट्रोल-डिझेलची चोरी रोखणार, आता 2 हजार टँकर्सना बसवणार ही अत्याधुनिक यंत्रणा

पेट्रोल-डिझेलची चोरी रोखणार, आता 2 हजार टँकर्सना बसवणार ही अत्याधुनिक यंत्रणा

या प्रकल्प असून या तिन्ही प्रकल्पातून रोज सुमारे 1 हजार 200 टँकरच्या माध्यमातून राज्यभरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल-डीझेलचा पुरवठा केला जातो.

  • Share this:

मनमाड 17 फेब्रुवारी : वेगवेगळ्या उपाययोजना करून देखील बनावट चावीचा वापर करून टँकर मधून पेट्रोल-डिझेलची चोरी करण्याच्या घटना थांबता थांबेना त्यामुळे अखेर भारत पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातील प्रशानाने आता टँकरसाठी नवीन इलेक्ट्रोनिक लॉक सिस्टीम आणली असून आज पासून पासून लागू करण्यात आली आहे.अत्याधुनिक असलेल्या या सिस्टीममुळे टँकर मधून केली जाणाऱ्या इंधन चोरीला शंभर टक्के आळा बसणार असल्याची माहिती  सूत्रांनी दिली. मनमाड पासून 4 ते 7 किमी अंतरावर नागापूर-पानेवाडी परिसरात इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे इंधन प्रकल्प असून या तिन्ही प्रकल्पातून रोज सुमारे 1 हजार 200 टँकरच्या माध्यमातून राज्यभरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल-डीझेलचा पुरवठा केला जातो.  8 वर्षा पूर्वी इंधनाच्या अवैध अड्ड्यावर छापा मारण्यासाठी गेलेले मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना इंधन माफियांनी जिवंत जाळून ठार मारल्याची घटना घडली होती.

त्यानंतर इंधन चोरीला आळा बसविण्यासाठी तिन्ही कंपन्यानी टँकरच्या टाकीचे तिन्ही कप्पे व वॉल बॉक्सला कुलूप लावण्याची पद्धत सुरु केली होती. या कुलुपाच्या दोन चाव्या तयार केल्यानंतर एक चावी प्रकल्पात तर दुसरी डीलर कडे देण्यात आली होती.

एका क्षणाचा विलंब जीववर बेतला असता, 3 सेकंदात काय घडलं पाहा CCTV VIDEO

शिवाय सर्व टँकरला जीपीएस सिस्टीम ने देखील जोडण्यात आले होते त्यामुळे टँकर कुठे चालला याची माहिती कंपनीला मिळत असे मात्र इंधन चोरांनी कुलपाच्या बनावट चाव्या तयार केल्या आणि त्याचा वापर करून टँकर मधून इंधन चोरी करू लागल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. दोन ठिकाणी कुलूप लावून देखील टँकर मधून केली जाणारी इंधन चोरी थांबता थांबेना त्यामुळे अखेर भारत पेट्रोलियम कंपनीच्या प्रशासनाने पेट्रोलियम अँड एक्स्लोजीव सेफ्टी लॉक अँड कि ही नवीन सिस्टीम लागू आज पासून लागू केली.

बारावीची परीक्षा उद्यापासून सुरू, 12 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी देणार पेपर

तिन्ही ऑयल कंपन्यांनी इंधन चोरी प्रकरणात सापडलेले सुमारे 35 टँकर ब्लॅक लिस्ट केले आहे.आता नवीन सिस्टीममुळे टँकर मधून होत असलेली इंधन चोरीला आळा बसतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

First published: February 17, 2020, 3:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या