• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • Petrol Price Today: आज पुन्हा वाढले इंधनाचे भाव, पेट्रोल 120 रुपये लीटर तर डिझेल 104 रुपयांवर

Petrol Price Today: आज पुन्हा वाढले इंधनाचे भाव, पेट्रोल 120 रुपये लीटर तर डिझेल 104 रुपयांवर

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price Today)आज सरकारी तेल कंपन्यांनी वाढ केली आहे. आज पेट्रोल डिझेलची किंमत (Petrol diesel price) 35 पैशांनी वाढली आहे.

  • Share this:
    मुंबई, 23 ऑक्टोबर: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price Today)आज सरकारी तेल कंपन्यांनी वाढ केली आहे. आज पेट्रोल डिझेलची किंमत (Petrol diesel price) 35 पैशांनी वाढली आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात काल देखील 35 पैसे प्रति लीटरने वाढ करण्यात आली होती. IOCL ने जारी केलेल्या दरानुसार आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर 113.12  रुपये आणि डिझेलचे दर प्रति लीटर 104.00 रुपये  आहेत. महत्त्वाच्या शहरांपैकी सर्वात महाग पेट्रोल मुंबईत मिळत आहे. आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर 17 वेळा वाढवण्यात आले आहेत. फक्त काही दिवस वगळता दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. ऑक्टोबरमध्येच पेट्रोल 5.15 रुपयांपेक्षाही जास्त दराने महाग झाले आहे, तर डिझेलही जवळपास 5 रुपयांनी वाढले आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना, पेट्रोल आणि डिझेलचे दरही सातत्याने वाढत आहेत. देशाच्या अनेक शहरांमध्ये यावेळी पेट्रोल दर 120 लीटरच्या जवळपास पोहोचला आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगर येथे पहिल्यांदाच पेट्रोल रु. 120 प्रति लीटरवर आहे. चार महानगरातील पेट्रोल-डिझेलचे दर >> दिल्ली पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 95.97 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 113.12 रुपये आणि डिझेल 104.00 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 104.22 रुपये आणि डिझेल 100.25 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 107.78 रुपये आणि डिझेल 99.08 रुपये प्रति लीटर या राज्यांत 100 रुपयांपार पेट्रोल मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांपार आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या कर आणि वाहतुकीच्या खर्चामुळे विविध राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील फरक असतो. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी केल्या जातात. वाचा-वयाच्या 12 व्या वर्षापासून Crypto मध्ये गुंतवणूक; 18 व्या वर्षी झाला कोट्यवधी अशाप्रकारे तपासा इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (Check Fuel prices via SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता.  तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: