मुंबई, 1 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होत आहेत. मुंबईत पेट्रोल 17 तर डिझेल 20 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
काही महिन्यांपूर्वी भडकलेल्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य हवालदिल झाले होते. याच मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात मोठी राळ उठवली होती. इंधन दराचा भडका झाल्याने मोदी सरकारवर चहुबाजूने टीका झाली. हा रोष कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने इंधनावरील करामध्ये कपात करण्याचाही निर्णय घेतला होता.
मुंबईतील इंधनाचे दर
पेट्रोल: 74.30 रुपये प्रतिलीटर
डिझेल: 65.56 रुपये प्रतिलीटर
दिल्लीत काय स्थिती?
पेट्रोल: 68.65 रुपये प्रतिलीटर
डिझेल: 62.66 रुपये प्रतिलीटर
#FuelPriceCut | #Petrol price cut by 17 paise to Rs 74.30/litre, #diesel by 20 paise to Rs 65.56/litre in Mumbai pic.twitter.com/5hCKGg8yIT
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) January 1, 2019
पेट्रोल-डिझेलचे दर का झाले कमी?
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या कमी होणाऱ्या किमती हे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचं मुख्य कारण आहे. मागील एका महिन्यात कच्च्या तेलाचे दर 40 टक्क्यांनी दर कमी झाले आहेत. तसंच लिबियाकडून अलिकडच्या काळात कच्च्या तेलाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.
ऑक्टोबरमध्ये कच्च्या तेलाचे दर 84 डॉलर प्रतिबॅरल एवढे होते. आता हेच दर 55 डॉलर प्रतिबॅरल इतके घसरले आहेत.
VIDEO: अमितच्या लग्नाची पत्रिका घेऊन राज ठाकरे सिद्धीविनायकाच्या चरणी