जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर शाहीन बागेत दोन गटात हाणामारी, पेट्रोल बॉम्बही फेकला

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर शाहीन बागेत दोन गटात हाणामारी, पेट्रोल बॉम्बही फेकला

देशभरातील नागरिक जनता कर्फ्यूदरम्यान घऱाबाहेर पडत नाही, शाहीन बागेत मात्र अद्याप आंदोलन सुरू आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 22 मार्च : कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या धोक्यामुळे आज देशभरात जनता कर्फ्यू (janata curfew) लावण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलं आहे. दिल्लीच्या शाहीन बागेत (Delhi shahin baug) नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) विरोधात सुरू असलेल्या निषेधादरम्यान दोन गट एकमेकांशी भिडल्याची माहिती समोर आली आहे.

सुमारे अर्धा तास दोन्ही गटांत मारहाण व शिवीगाळ सुरू होती. यापैकी एक गट हा पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूच्या घोषणेस पाठिंबा द्यावा असं आवाहन करीत होता, तर दुसरा गट आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हता. काही वेळाने हा गोंधळ शांत करण्यात आला.

संबंधित - पाकने रुग्णांना दिली अशी वागणूक की भारतीयांचेही डोळे पाणावले

शाहीन बाग आंदोलनाच्या ठिकाणाजवळील पोलीस बॅरिकेटवर कोणीतरी पेट्रोल बॉम्ब फेकला, त्यामुळे स्फोट झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.  पोलिसांनी सांगितले की, शाहीन बागच्या आतील रस्त्यावरुन कोणीतरी हा बॉम्ब फेकला होता. शाहीन बागेत पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्या व्यक्तीने जामिया विद्यापीठाबाहेरील गेट क्रमांक 7 च्या समोरही बॉम्ब फेकला. यात कोणीही जखमी झाले नाही. ज्याने पेट्रोल बॉम्ब फेकला तो दुचाकीवरून जात होता.

शनिवारी इंडिया इस्लामिक सेंटर येथे आंदोलनकर्त्यांसह पोलिसांची बैठक होती, तेथे दोन्ही पक्षांमध्ये भांडण झाले होते. एका गटाला शाहीन बाग उघडण्याची इच्छा होती. तर दुसरा याच्याविरोधात होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सार्वजनिक बंदोबस्ताच्या दरम्यान शाहीन बागेत सुरू असलेल्या निषेधार्थ निदर्शकात काही महिलांनी पोलिसांचे ऐकले नाही आणि सुमारे 5 ते 6 महिला अजूनही निदर्शनं करीत आहेत. उर्वरित महिला आणि इतर निदर्शक आज शाहीन बागच्या निदर्शने स्थळावर गैरहजर राहिल्या

संबंधित - कोरोना झाला नसतानाही होईल या भीतीने दोघांची आत्महत्या, असं संपवलं सुंदर आयुष्य

Tags:
First Published: Mar 22, 2020 02:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading