मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Explainer : पाकिस्तानात पेट्रोल 51 रु. लिटर, तर भारतात 100 च्या पार; का आहे इतकी तफावत? वाचा कारण

Explainer : पाकिस्तानात पेट्रोल 51 रु. लिटर, तर भारतात 100 च्या पार; का आहे इतकी तफावत? वाचा कारण

Petrol price

Petrol price

देशभरातील विविध राज्यांमध्ये पेट्रोल 100 च्या जवळ गेलं असून राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh) काही भागांमध्ये पेट्रोलने 100 चा आकडा पार केला आहे. इतर देशांची तुलना (Petrol Price Comparison) करायची झाल्यास शेजरील पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा भाव 51 रुपये प्रतिलिटर आहे. तर भारतात याच्या दुप्पट आहे.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी: मागील काही दिवसांपासून देशभरात पेट्रोलच्या किमतीने आभाळ गाठले आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये पेट्रोल 100 च्या जवळ गेलं असून राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh) काही भागांमध्ये पेट्रोलने 100 चा आकडा पार केला आहे. इतर देशांची तुलना (Petrol Price Comparison) करायची झाल्यास शेजरील पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा भाव 51 रुपये प्रतिलिटर आहे. तर भारतात याच्या दुप्पट आहे. खरंतर जगभरातील देशांचा विचार करायचा झाल्यास किंमतीच्या बाबतीत पाकिस्तान 31 व्या क्रमांकावर आहे तर भारत 115 व्या. पण असं का ? मागील एका वर्षाचा विचार करायचा झाल्यास 17 रुपये प्रतिलिटर किंमत वाढली आहे. यामध्ये चलनाचे अवमूल्यन आणि अंतरराष्ट्रीत बाजारभावाचा विचार करायचं झालं तर पाकिस्तान आणि अन्य देशांमध्ये या किमती दुप्पट तिप्पट असायला हव्यात. पण असं का नाही याचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

    शेजारी देशांमध्ये किंमत किती ?

    भारताच्या शेजारील देशांशी तुलना करायचे झाल्यास सर्वच देशांमध्ये भारतापेक्षा पेट्रोल आणि डिझेल स्वस्त आहे. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यात जर डॉलरच्या अवमूल्यनावर किमती ठरल्या असत्या तर या देशांमध्ये भारतापेक्षाही कितीतरी अधिक पटीने या किमती जास्त हव्या होत्या. कारण भारतीय चालनापेक्षा या देशांचे चलन डॉलरच्या तुलनेत कैक पटीने लहान आहे. उधारणादाखल पाहायचं झाल्यास अमेरिकन चलनातील एक डॉलर भारतीय रुपयाच्या तुलनेत 72.56 रुपये आहे. तर पाकिस्तानी रुपयाच्या तुलनेत 159.26 रुपये आहे.

    या वर्षी भारतात पेट्रोलच्या किमती किती वाढल्या ?

    फेब्रुवारी महिन्याचा विचार करायचं झाल्यास दिल्लीमध्ये 3.24 रुपये प्रति लीटर इतकी वाढ झाली आहे. याचबरोबर मागील महिन्यात देखील 10 वेळा पेट्रोलचे भाव वाढले आहेत. त्यामुळं एकूण 2 महिन्यात 6 रुपये प्रतिलिटर भाववाढ झाली आहे. जर याच गतीने पेट्रोल आणि डिझलचे भाव वाढत राहिलरें तर यावर्षी पेट्रोल 36 रुपये प्रतिलिटर वाढण्याची शक्यता आहे.

    भारतातील टॅक्स सिस्टीम कशी आहे ?

    भारतात पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळा कर आकारते. युरोपमध्ये तेलाच्या किमती भारतापेक्षा जास्त आहेत परंतु टॅक्स कमी आहे. भारतात प्रत्येक राज्यात आणि शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या वेगवेगळ्या आहेत. जपान आणि अमेरिकेची तुलना केल्यास त्यांच्या आणि भारताच्या टॅक्सच्या आकडेवारीमध्ये खूप फरक आहे. अमेरिकेमध्ये भारताच्या तुलनेत 35 ते 40 टक्के पेट्रोल स्वस्त आहे. याच पद्धतीने पाकिस्तानमध्ये देखील एकच टॅक्सव्यवस्था असून वेगवेगळे कर आकारले जात नाहीत. त्यामुळं भारतात ही व्यवस्था कशी आहे हे एकदा समजून घ्या.

    तुमच्या खिश्यावर अशा पद्धतीने पडतो बोझ

    1 जानेवारीला दिल्लीमध्ये पेट्रोल 83.71 रुपये प्रतिलिटर होते. यामध्ये सुरुवातीला पेट्रोलची बेसिक किंमत ही 27.37 होती. यामध्ये 0.37 रुपये प्रति लीटर वाहतूक खर्च जोडावा लागला. त्यानंतर या किमतीवर कर आकारला जातो. यामध्ये केंद्र सरकार 32.98 रुपये एक्सईज ड्युटी घेते. त्यानंतर डिलरने 3.67 प्रतिलिटर कमिशन घेतलं. यानंतर राज्य सरकारने वहात आणि इतर करांच्या रूपात त्यामध्ये 19.32 रुपये कर जोडल्यानंतर ही रक्कम 83.71 रुपये होते. याच पद्धतीने प्रत्येक राज्यात वेगवेगळा कर आकारला जातो. त्यामुळं किमतींमध्ये फरक पडू शकतो.

    1)पेट्रोलच्या बेसिक किमतीवर 227 टक्के टॅक्स आणि डिझेलच्या बेसिक किमतीवर 191 टक्के टॅक्स आकारला जातो.

    2)मध्य प्रदेश, केरल, राजस्थान, कर्नाटक या राज्यांमध्ये सर्वाधिक 30 टक्के व्हॅट आकारला जातो.

    3)जर सरकारने पेट्रोलवर १३ रुपये आणि डिझेलवर 10 रुपये एक्साइज़ ड्यूटी वाढवली तर सरकारी खजिन्यामध्ये अंदाजे 1.6 लाख कोटी रुपयांची भर पडते.

    4)जगभरातील अनेक देशांचा सरासरी भाव बघितला तर तो 78.65 रुपये होतो.भारतात अरुणाचल प्रदेशात 83.19 रुपये इतकं सर्वर स्वस्त पेट्रोल मिळते. म्हणजेच जगभरातील सरासरी किमतींपेक्षाही 5 रुपये महाग आहे.

    50प्रति व्यक्ती दिवसाचा जीडीपीचा विचार केल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये 157 देशांमध्ये भारत 131 व्या क्रमांकावर आहे

    अवश्य वाचा -  इंधन दरवाढीचा फटका; रिक्षा आणि टॅक्सीचं भाडंही वाढलं; पाहा नवे दर

    जीएसटीचं गणित काय ?

    संपूर्ण देशात एकासारखी करव्यवस्था करण्यासाठी जीएसटी लागू करण्यात आली आहे. परंतु यामधून पेट्रोलियम पदार्थ वगळण्यात आले आहेत. त्यामुळं पेट्रोल, जीएसटीच्या स्लॅबमध्ये येत नाही. समजा पेट्रोलियम पदार्थ जीएसटीमध्ये आले असते तर जास्तीतजास्त 28 टक्के कर भरावा लागला असता. म्हणजेच समजा 23 रुपये लिटर पेट्रोलची किंमत असेल तर यावर 28 टक्के जीएसटी आणि 22 टक्के व्हॅट पकडून एकूण ३७ रुपये कर द्यावालागेल. पण हा करदेखील सध्याच्या 227 टक्के करापेक्षा कमी आहे. त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये थेट 50 टक्क्याची बचत होणार आहे.

    पाकिस्तानमध्ये किती टॅक्स :

    पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर 23.5% टॅक्स असून अमेरिकेत केवळ 17 टक्के टॅक्स आकारला जातो. पाकिस्तान सरकारने यासंदर्भात सुप्रीम कोर्टात माहिती दिली आहे. त्यानुसार पाकिस्तानमध्ये पेट्रोलवर 8.83 रुपये वाहतूक खर्च लावला जातो. याचबरोबर 15 टक्के टॅक्स देखील आकारला जातो. त्यामुळं पाकिस्तानमध्ये तेलाच्या किमती इतक्या आहेत. मुळात आपण पाकिस्तानमध्ये ज्या तेलाच्या किमती पाहत आहोत त्या भारतीय रुपयांमध्ये आहेत. परंतु पाकिस्तानमध्ये त्यांच्या चलनानुसार हे दर सरासरी 91 ते 92 रुपये प्रतिलिटर आहेत.

    First published:

    Tags: Pakistan, Petrol and diesel price, Petrol Diesel hike