मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

आता तरी बोला, जितेंद्र आव्हाडांनी काढला अमिताभ बच्चन यांना चिमटा

आता तरी बोला, जितेंद्र आव्हाडांनी काढला अमिताभ बच्चन यांना चिमटा

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती इतक्या वाढल्या आहे की मुंबईकरांनी कार चालवायची की जाळायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती इतक्या वाढल्या आहे की मुंबईकरांनी कार चालवायची की जाळायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती इतक्या वाढल्या आहे की मुंबईकरांनी कार चालवायची की जाळायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई, 26 जून :  देशभरात इंधन दरवाढीमुळे भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आता अक्षयकुमार पाठोपाठ बॉलिवडूचे शहेशहा अमिताभ बच्चन यांनाच आवाहन केले आहे.

इंधन दरवाढीवर अमिताभ बच्चन यांनी एक गंमतीशीर ट्वीट केले होते. त्यांच्या या ट्वीटला जितेंद्र आव्हाड यांनी रिट्वीट करून 'ही वेळ आता आवाज उठवण्याची आहे'असा सल्लाच आव्हाडांनी अमिताभ बच्चन यांना दिला आहे.

'तुम्ही पेट्रोल भरले नाही का, जर भरले असेल आणि बिलकडे लक्ष दिले नसेल तर हीच वेळ आहे बोलण्याची. मी अपेक्षा करतो की तुम्ही यात दुटप्पी भूमिका घेणार नाही.' असा टोलाही आव्हाडांनी बच्चन यांना लगावला.

तसंच 'पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती इतक्या वाढल्या आहे की मुंबईकरांनी कार चालवायची की जाळायची असा प्रश्न निर्माण झाला आहे' असंही आव्हाड म्हणाले.

याआधीही गुरुवारी त्यांनी अभिनेता अक्षयकुमारला टोला लगावला होता.'अक्षय, तू ट्विटरवर सक्रिय नाहीस का?... तू कार वापरणं बंद केलंस का?... तू वर्तमानपत्र वाचत नाहीस का?... तुझ्या माहितीसाठी सांगतो की देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत,' असं आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अक्षय कुमार यानं यूपीए सरकारच्या काळात 9 वर्षांपूर्वी म्हणजेच 16 मे 2011 रोजी इंधनाच्या महागाईवरून खोचक ट्वीट केलं होतं. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्याच मुद्द्यावरून आता अक्षयकुमार याला टोला लगावला होता.

20 व्या दिवशी इंधनाचे दर भडकले

दरम्यान, सलग 20 व्या दिवशी इंधनाचे दर भडकले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानं नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. डिझेल 17 तर पेट्रोल 21 पैशांनी महाग झालं आहे. दिल्लीमध्ये डिझेलचे दर पेट्रोलला मागे टाकत वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. 20 दिवसामध्ये डिझेलच्या किंमतीत तब्बल 10.79 पैशांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोल 8.87 रुपयांनी महागलं आहे.

संपादन - सचिन साळवे

First published:

Tags: Amitabh Bachchan, Disel, Jitendra awhad, NCP, Petrol, अमिताभ बच्चन, जितेंद्र आव्हाड