सोलापूर, 15 ऑगस्ट : करमाळा तालुक्यातील जेऊर पोलीस चौकीतील अधिकारी तक्रार घेत नसल्याने हतबल युवकाने केला आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयाबाहेर ध्वजवंदनावेळी हा प्रकार घडला आहे. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेत नसल्याने संतापलेल्या तरुणाने अंगावर रॉकेल ओतून घेतलं आणि आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पण पोलिसांच्या प्रसंगवधाने या तरुणाचा जीव वाचवण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.