ऑफरवर मिळणारा बिअरचा ग्लास दिला नाही म्हणून तरुणावर चालवली तलवार

ऑफरवर मिळणारा बिअरचा ग्लास दिला नाही म्हणून तरुणावर चालवली तलवार

बिअर पिण्याचा ग्लास मोफत दिला नाही म्हणून एका बिअर शॉपीवर सशस्त्र गुंडांनी हल्ला चढवला आहे.

  • Share this:

नागपूर, 4 ऑगस्ट : बिअर पिण्याचा ग्लास मोफत दिला नाही म्हणून एका बिअर शॉपीवर सशस्त्र गुंडांनी हल्ला चढवला आहे. शॉपीमधील एका तरुणावर तलवारीने हल्ला करून हिमांशु चौरावार नामक तरुणाला जबर जखमी केलं आहे. मारहाण केल्यानंतर गुंडांनी बीअर शॉपवर दगडफोडही केली. त्यानंतर तेथून गुंडांनी पळ काढला. बुधवारी रात्री अमरावतीरोडवर असलेल्या बिअर शॉपमध्ये ही घटना घडली. मात्र हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालायं.

जयदुर्गा लेआऊट नरेंद्रनगरमध्ये राहणारे राजू दामोदर रेड्डी यांची अमरावती मार्गावर झिरो बिअर शॉपी आहे. तेथे बुधवारी रात्री १०च्या सुमारास तीन तरुण आले. त्यांनी तेथून बिअर घेतल्यानंतर सुरू असलेल्या स्कीमनुसार बिअरचा एक मग जास्त मागितला. तो दिला नाही म्हणून आरोपींनी रेड्डी तसेच त्यांच्या दुकानात काम करणारा चौरावार याला शिवीगाळ करून निघून गेले. काही वेळेनंतर पाच ते सहा आरोपी तलवारीसह बिअर शॉपीत आले.

'एक बिअर का मग न देने की किमत क्या है, ये तुमको बताते है', असे म्हणत आरोपींनी बिअर शॉपीत तोडफोड सुरू केली. एकाने चौरावार यांच्यावर तलवारीने हल्ला चढवला तर, काहींनी बाहेर निघताना बिअर शॉपीवर दगडफेक केली. तोडफोड करून आरोपी पळून गेले. रेड्डी यांनी अंबाझरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

 

 'Post Office'ची नवी सुविधा, 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळणार बक्कळ पैसे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2018 01:50 PM IST

ताज्या बातम्या