सारा तेंडुलकरच्या नावानं शरद पवारांविरोधात ट्विट करणारा पोलिसांच्या ताब्यात

सोशल साईटवरुन साराचा फोटो डाऊनलोड हे खोटं अकाऊंट तयार करण्यात आलं होतं.

Renuka Dhaybar | Updated On: Feb 8, 2018 04:25 PM IST

सारा तेंडुलकरच्या नावानं शरद पवारांविरोधात ट्विट करणारा पोलिसांच्या ताब्यात

08 फेब्रुवीरी : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरच्या नावाचं खोटं अकाऊंट तयार करुन शरद पवार यांच्या विरोधात ट्विट करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नितीन सिसोदे असं या अटक केलेल्या व्यक्तिचं नाव आहे. सोशल साईटवरुन साराचा फोटो डाऊनलोड हे खोटं अकाऊंट तयार करण्यात आलं होतं.

या फेक अकाऊंटवरून राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर बेछूट आरोप करण्यात आले होते.

'शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राला लुटण्याचा प्रयत्न केला. हे सगळ्यांनाच माहित आहे. पण त्यांनी केंद्रालाही लुटायचा प्रयत्न केला, हे फारसं जगजाहीर नाही.' असं त्या ट्विटमध्ये लिहण्यात आलं होतं.

नितीन सिसोदे या व्यक्तिनं 9 ऑक्टोबर 2017ला हे ट्विट केलं होतं. आता पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 8, 2018 01:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close