विश्वास नांगरेपाटील अॅक्शनमध्ये, ही चूक केली तर 3 महिन्यांसाठी जप्त होणार गाडी

विश्वास नांगरेपाटील अॅक्शनमध्ये, ही चूक केली तर 3 महिन्यांसाठी जप्त होणार गाडी

लोक अजूनही घराबाहेर हिंडण्यासाठी निघतात. सोशल डिस्टंसिंग तर पायदळी तुडवलं आहे.

  • Share this:

नाशिक 28 मार्च : कोरोनाचा वाढता फैलाव थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं. पण नागरिकांना मात्र या आजाराचं गांभीर्य काही लक्षात येत नाहीये. नियमांचं उल्लंघन करून नागरिक विनाकारण बाहेर पडत आहेत. यावर पोलिसांनी कडक कारवाई केल्याच्या अनेक व्हिडिओ आणि बातम्या आपण सोशल मीडियावर पाहिल्या. पण यातून काही शिकलात का? तर नाही...

लोक अजूनही घराबाहेर हिंडण्यासाठी निघतात. सोशल डिस्टंसिंग तर पायदळी तुडवलं आहे. पण अशावर आता पोलिसांनीही कारवाईला आणखी धार आणली आहे. कारण नसताना बाहेर फिरणाऱ्या लोकांच्या गाड्या आता तीन महिन्यांसाठी जप्त होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. असे आदेशच नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील 100 हॉटेलला केवळ फूड पार्सल सेवा सुरू करण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आहे.

दरम्यान, एकीकडे लोक नियमांचं पालन करत नाहीत तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आणखी नवे कोरोनाचे 05 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर नागपुरात एका रुग्णाच्या टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं आता एकूण रुग्णांची संख्या 159 वर पोहोचली आहे.

शुक्रवारी दिवसभरात मुंबईतील भाभा आणि कस्तुरबा रुग्णालयात 9 रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आता कोरोनाग्रस्तांची संख्या 91 झाली आहे. तर आतापर्यंत मुंबईत 05 जणांचाा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत संशयित रुग्णांसह 209 कॉरोनाग्रस्त दाखल आहेत. शुक्रवारी दिवसभरात एकूण 17 नवीन रुग्ण आढळले होते. सांगलीमध्ये नवे 12 रुग्ण तर नागपूरमध्ये 5 रुग्ण आढळले असून राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्याही तब्बल 159 वर पोहोचली आहे. नवी मुंबईत दीड वर्षाच्या बाळाला कोरोनाची लगण झाली आहे.

First published: March 28, 2020, 10:26 AM IST

ताज्या बातम्या