निर्लज्जपणाचा कळस, कठुआ बलात्कार पीडितेचा व्हिडिओ पॉर्न साईटवर शोधताय लोकं!

निर्लज्जपणाचा कळस, कठुआ बलात्कार पीडितेचा व्हिडिओ पॉर्न साईटवर शोधताय लोकं!

ही अत्यंत धक्कादायक आणि भारतीय समाजासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे.

  • Share this:

मुंबई, 08 डिसेंबर : हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला. या घटनेचा देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. पोलिसांवर फुलंही उधळण्यात आली. या घटनेवर दोन्ही बाजूने बोललं जात आहे. परंतु, माणूस हा किती निर्लज्ज असू शकतो याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. कठुआ बलात्कार प्रकरणातील पीडितेचा व्हिडिओ एका पॉर्नसाईटवर शोधला जात आहे.

indiatimes या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार,  जगातील सर्वात मोठ्या पॉर्नसाईट असलेल्या एक्स व्हिडिओ वर हा व्हिडिओ शोधला जात आहे. या संकेतस्थळाचे भारतीय व्हर्जनमध्ये 'Asifa' या नावाने हा व्हिडिओ ट्रेंड होत आहे.

ही अत्यंत धक्कादायक आणि भारतीय समाजासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. एका सर्व्हेनुसार, भारतीय हे पॉर्नसाईटवर prolific consumers म्हणून ओळखले जातात. पोर्नग्राफ पाहण्याच्या तुलनेत यांचा वाटा हा तब्बल 40 टक्के आहे.

या संकेतस्थळावर इतर Forced sex India आणि rape sex videos Indian” असेही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले जात असल्याची धक्काबाब समोर आली आहे.

एकीकडे हैदराबाद प्रकरणीतील आरोपींना पोलिसांनी एन्काऊंट करून ठार मारलं. यानंतर अनेक जणांनी बलात्कार करणाऱ्या नराधमांना अशीच शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली. परंतु, अशा घटनेनंतरही एका बलात्कार प्रकरणातील त्या मृत मुलीच्या व्हिडिओ एखाद्या पॉर्नसाईटवर शोधला जात असेल तर समाजासाठी न शोभणारी नाही.

काय आहे कठुआ प्रकरण!

2018मध्ये जम्मूमध्ये झालेल्या कठुआ बलात्कार प्रकरणानं सारा देश हादरून गेला होता. जम्मू – काश्मीरमधल्या कठुआमध्ये बकरवाल समाजातल्या 8 वर्षाच्या मुलीला ओलीस ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली होती. यामध्ये पोलिसांचा सहभाग देखील समोर आला होता. 3 जून रोजी या प्रकरणाची सुनावणी पार पडली.

2018मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील मास्टरमाईंडने बकरवाल समाजातील मुसलमानांना बाहेर काढण्यासाठी हे निर्घृण कृत्य करण्यासाठी भडकवलं होतं. अमानवी कृत्य करण्यासाठी त्याने आपल्या भाच्यासह आणखी सहा जणांना भडकवल्याची धक्कादायक माहिती चौकशीअंती समोर आली होती. जम्मू-काश्मीरमध्ये बकरवाल समाजातले लोक प्रामुख्याने गुराख्याचं काम करतात.

'या सामूहिक बलात्काराचा मास्टरमाईंड सांजी राम हा बकरवाल आणि हिंदूमध्ये समेट घडवण्याच्या विरोधात होता. तो नेहमी बकरवालांना जनावरे चरण्यासाठी जमीन देण्यात येऊ नये यासाठी हिंदूंना भडकावत असे'. असं कठुआचे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना सोपवण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2019 08:36 AM IST

ताज्या बातम्या