मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'ओ कोरोना कल आना', स्त्री चित्रपटाप्रमाणे गल्लोगल्ली लावले पोस्टर

'ओ कोरोना कल आना', स्त्री चित्रपटाप्रमाणे गल्लोगल्ली लावले पोस्टर

बनारस शहर आपल्या भन्नाट विचारसरणीसाठी ओळखले जाते. त्यामुळे कोरोनावरही विजय मिळविण्यासाठी बनारसमधील लोकांनी अनोख्या मार्गाने आपला संदेश दिला आहे.

बनारस शहर आपल्या भन्नाट विचारसरणीसाठी ओळखले जाते. त्यामुळे कोरोनावरही विजय मिळविण्यासाठी बनारसमधील लोकांनी अनोख्या मार्गाने आपला संदेश दिला आहे.

बनारस शहर आपल्या भन्नाट विचारसरणीसाठी ओळखले जाते. त्यामुळे कोरोनावरही विजय मिळविण्यासाठी बनारसमधील लोकांनी अनोख्या मार्गाने आपला संदेश दिला आहे.

  वाराणसी, रवि पांडेय, 19 मार्च : कोरोना व्हायरस (Coronavirus)चा देशातील विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसागणिक कोरोना पँडेमिकचे नवीन रुग्ण देशामध्ये आढळून येत आहेत. कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे उपाय करत आहेत. त्यातील काही उपाययोजना बरोबर आहेत तर काही चुकीच्या. मात्र अशावेळी कोरोनाबाबत जागरूकता पसरवणं अधिक गरजेचं आहे. ही जनजागृती करण्यासाठी भारतातील अनेक शहरात वेगवेगळ्या कल्पना वापरण्यात येत आहेत. पण बनारसमधली ही संकल्पना पाहून कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतही तुमच्या चेहऱ्यावर एकदम हास्य उमटेल. (हे वाचा-कोरोनाबाधित इटलीतून मुंबईच्या मुलीची सुटका, वडिलांनी मोदींना म्हटलं ‘बापमाणूस’) स्त्री चित्रपटातील तो डायलॉग आठवतो आहे का? 'ओ स्त्री कल आना!' या डायलॉगचा वापर करून आता कोरोनासाठीही करण्यात येतोय. ज्याप्रमाणे या चित्रपटातील 'स्त्री'ला लोकं घाबरत होते, तेवढीच दहशत कोरोनाची पसरली आहे. त्यामुळे बनारसकरांनी ही शक्कल लढवली आहे. बनारस शहर आपल्या भन्नाट विचारसरणीसाठी ओळखले जाते. त्यांनी लढवल्या शक्कलही अनोख्या असतात. मग कोरोनावरही विजय मिळविण्यासाठी बनारसमधील लोकांनी अनोख्या मार्गाने आपला संदेश दिला आहे. वाराणसीच्या खोजवा भागात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री' या चित्रपटाच्या धर्तीवर घराबाहेर पोस्टर लावण्यात आले आहेत. जसं स्त्री मध्ये अनेकांच्या घराबाहेर लिहिलेलं होत की, ‘ओ स्त्री कल आना’ तसंच या घराबाहेर लिहिलं आहे की, ‘ओ कोरोना कल आना’. (हे वाचा-'गादीवर झोपा, कोरोना पळवा', खोटी जाहिरात केल्याप्रकरणी भिवंडीत गुन्हा दाखल) मात्र ज्याप्रमाणे चित्रपटामध्ये हा अंधश्रद्धेचा भाग होता, तसं याठिकाणी नाही आहे. कोरोनाबाबत जनजागृती व्हावी यासाठी हे पोस्टर लावण्यात आले आहेत. या भागात जरी पोस्टर लावण्यात आले असले, तरी हा लोकं स्वच्छतेचा अवलंब देखील काटेकोरपणे करत आहेत.
  !function(e,i,n,s){var t="InfogramEmbeds",d=e.getElementsByTagName("script")[0];if(window[t]&&window[t].initialized)window[t].process&&window[t].process();else if(!e.getElementById(n)){var o=e.createElement("script");o.async=1,o.id=n,o.src="https://e.infogram.com/js/dist/embed-loader-min.js",d.parentNode.insertBefore(o,d)}}(document,0,"infogram-async"); दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून सर्वोतपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. जगभरातून भारताच्या या कामगिरीचं कौतुक देखील होत आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Coronavirus, Stree

  पुढील बातम्या