Home /News /news /

बाब्बो! मुंबईत 'नो किसिंग झोन'ची घोषणा; याठिकाणी जोडप्यांना नाही करता येणार KISS

बाब्बो! मुंबईत 'नो किसिंग झोन'ची घोषणा; याठिकाणी जोडप्यांना नाही करता येणार KISS

PC- ABP Majha

PC- ABP Majha

No Kissing Zone in Mumbai: मुंबईत सध्या 'नो किसिंग झोन'ची चांगलीच चर्चा सुरू आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे.

    मुंबई, 01 ऑगस्ट: शहरातील पार्क, हॉटेल, मॉल्स, चित्रपटगृहे अशा सार्वजानिक ठिकाणी विविध झोन तयार केले जातात. आपण यापूर्वी नो पार्किंग झोन, नो स्मोकिंग झोन अशा झोनबाबत ऐकलं असेल. पुण्या-मुबंईसारख्या लोकसंख्येनं गजबजलेल्या शहारांत अशाप्रकारचे बरेच झोन आपल्याला आढळतील. पण मुंबईतील एक वेगळाच झोन सध्या चर्चेत आला आहे. तो म्हणजे 'नो किसिंग झोन' (No Kissing Zone). मुंबईच्या (Mumbai) बोरिवली (Boriwali) भागात काही स्थानिक नागरिकांनी जॉगर्स पार्क (Joggers Park) परिसरात या झोनची घोषणा केली आहे. नागरिकांनी रस्त्यावर पिवळ्या रंगामध्ये 'नो किसिंग झोन' लिहून संबंधित परिसरात किसिंग करण्याला मज्जाव केला आहे. एबीपीनं दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील बोरिवली पश्चिम परिसरात जॉगर्स पार्क नावाचं एक ठिकाण आहे. याठिकाणी परिसरातील अनेक नागरिक सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी येतात. पण येथे काही जोडपे देखील अश्लील चाळे करण्यासाठी येतात. तरुण जोडप्यांच्या अश्लील कृत्यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. अशा जोडप्यांना चाप बसवण्यासाठी येथील काही नागरिकांनी थेट या परिसराला 'नो किसिंग झोन' घोषित केला आहे. हेही वाचा-वाढदिवसाला बोलवून फेसबुकवरील मित्रानं केला घात; गुंगीच औषध देत तरुणीवर बलात्कार नागरिकांनी जॉगर्स पार्क परिसरातील रस्त्यावर 'नो किसिंग झोन' लिहिलं आहे. बोरिवलीच्या चिकुवाडीतील सत्यम शिवम सुंदरम सोसायटी आहे. याच सोसायटीजवळ हा जोगर्स पार्क आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू असूनही बरेच जोडपे याठिकाणी दुचाकी आणि चारचाकीत येतात. आणि रस्त्याच्या कडेला, पार्क परिसरात, कारमध्ये किंवा दुचाकीवरच अश्लील चाळे सुरू करतात. हेही वाचा-दादर रेल्वे स्टेशनवर तरुणाचे विकृत चाळे; अनोळखी महिलेला घट्ट मिठी मारली अन्... यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होतं होता. तसेच या पार्कमध्ये लहान मुलंही खेळायला येतात. अशा स्थितीत अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांना रोखण्यासाठी नागरिकांनी थेट 'नो किसिंग झोन'ची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे जॉगर्स पार्क परिसरात नो किसिंग झोनची घोषणा केल्यापासून अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यानं इकडे येणं थांबवलं आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mumbai

    पुढील बातम्या