VIDEO: मुंबई पोलिसांना जबर मारहाण, संतप्त नागरिकांनी फोडल्या गाड्या

स्थानिकांकडून रास्ता रोको करत पोलिसांना मारहाण तर त्यांच्या गाड्याही फोडण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 05:32 PM IST

VIDEO: मुंबई पोलिसांना जबर मारहाण, संतप्त नागरिकांनी फोडल्या गाड्या

चेंबूर, 22 ऑक्टोबर : मुंबईच्या चेंबूर इथे पोलिसांनाच मारहाण आणि दगडफेक केल्याची बातमी समोर येत आहे. स्थानिकांकडून रास्ता रोको करत पोलिसांना मारहाण तर त्यांच्या गाड्याही फोडण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑक्टोबरला कुर्ला ठक्करबाप्पा इथल्या स्थानिकाने लोकल रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली होती कारण काही महिन्यांपूर्वी त्यांची मुलगी हरवली होती. तिचा पोलिसांनी शोध न घेतल्याने या व्यक्तीने आत्महत्या केली होती. याचा राग म्हणून आज स्थानिकांनी पोलिसांनाच मारहाण केली.

कुर्ला ठक्कर बाप्पा इथल्या 6 महिन्यापूर्वी हरवलेल्या आरती रिठाडीया हिचा तपास लावण्यात कुर्ला नेहरूनगर पोलीस चालढकल करत असल्याने आरतीचे वडील पाचाराम रिठाडीया यांनी 10 दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्याच्या निशेधार्थ आज कुर्ला नेहरूनगर येथून पाचाराम यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ज्यामध्ये तब्बल 10हजारांहून अधिक स्थानिक लोक आणि रेगर समाज सहभागी झाला होता. या वेळी मयत पाचाराम कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरला होता.

इतर बातम्या - बालपणाच्या मैत्रीवर अपघाताने घातला घाला, 3 मित्रांचा जागीच मृत्यू

यावेळी संतप्त नागरिकांनी पोलिसांचं वाहन, एसटी बस स्थानिकांनी फोडल्या. पोलिसांनी बाळाचा वापर करून स्थानिकांना रोड वरून बाजूला केलं. पण त्यानंतर संपूर्ण परिसरात स्थानिकांनी दगडफेक केली आणि पोलिसांनाही मारहाण केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 05:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...