Home /News /news /

यूपीएल प्रोन्युटिवा शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण, भुईमुगाच्या उत्पादनात 24-32 टक्क्यांनी वाढ

यूपीएल प्रोन्युटिवा शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण, भुईमुगाच्या उत्पादनात 24-32 टक्क्यांनी वाढ

भुईमुगाच्या पिकाचे उत्पादन व त्यातील तेलाचा अंश वाढवण्याच्या उद्देशाने, यूपीएल प्रोन्युटिवा (UPL Pronutiva) हा शेतकरीकेंद्री कार्यक्रम गुजरातमध्ये राबवला. हा कार्यक्रम सोळा जिल्हे व 1722 खेड्यांमध्ये राबवण्यात आला आणि त्याचे उत्तम फळ बघायला मिळले.

पुढे वाचा ...
    मुंबई, 9 डिसेंबर : यूपीएल लिमिटेड या कृषी उत्पादने व सोल्युशन्सच्या जागतिक स्तरावरील पुरवठादार कंपनीने, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या तसेच भुईमुगाच्या पिकाचे उत्पादन व त्यातील तेलाचा अंश वाढवण्याच्या उद्देशाने, यूपीएल प्रोन्युटिवा (UPL Pronutiva) हा शेतकरीकेंद्री कार्यक्रम गुजरातमध्ये राबवला. हा कार्यक्रम सोळा जिल्हे व 1722 खेड्यांमध्ये राबवण्यात आला आणि त्याचे उत्तम फळ बघायला मिळले. भावनगरजवळील खेड्यांमध्ये या कार्यक्रमामुळे भुईमुगाच्या उत्पादनात 38 टक्क्यांनी वाढ झाली, तर कलवाड तालुक्यातील भुईमुगाचे उत्पादन तब्बल 62 टक्क्यांनी वाढले. एकूण उत्पन्नात 27-32 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे, या प्रकल्पाने प्रत्यक्ष शेती करणाऱ्या 120000 शेतकऱ्यांच्या मनाला व हृदयाला स्पर्श केला. यूपीएलने 2021 सालातील खरीप हंगामात, गुजरातमधील 100000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची व 100000 एकर जमीन यूपीएल प्रोन्युटिवाखाली आणण्याची, महत्त्वाकांक्षी योजना आखली. यूपीएलने आपल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देणाऱ्या धोरणामुळे, शेतकऱ्यांना प्रथमच बियाण्यांवर उपचार करणारी यंत्रे देऊन सुसज्ज केले आणि प्रोन्युटिवा कार्यक्रमाखाली वापरली जाणारी साधने वापरण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले. प्रगतीशील नवोन्मेषाचा उपयोग करत तसेच शाश्वततेचा नव्याने विचार करत, यूपीएलने शेतकऱ्यांना झेबा व कोपिओ ही यूपीएलची दोन शाश्वत तंत्रज्ञानेही पुरवली. भारत हा चीननंतर भुईमुगाचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक आहे. देशात दर एकरामागे सरासरी 20 क्विंटल भुईमुगाचे उत्पादन होते. भारतात सुमारे 3.8 दशलक्ष हेक्टर्सवर भुईमूग लावला जातो. गुजरात (38 टक्के), आंध्रप्रदेश (17 टक्के), राजस्थान (14 टक्के), कर्नाटक (10 टक्के) व महाराष्ट्र (5 टक्के) ही पाच राज्ये मिळून देशातील एकूण भुईमूग उत्पादनातील 84 टक्के वाटा उचलतात. भारतातील खाद्यतेलाचा वापर दरवर्षी सुमारे 21 दशलक्ष मेट्रिक टन आहे. खाद्यतेलाचे देशांतर्गत उत्पादन 9 दशलक्ष टन असल्यामुळे, उरलेले 13 दशलक्ष टन खाद्यतेल दरवर्षी आयात करून हे अंतर भरून काढले जाते. मलेशियातील पाम तेल, अमेरिकेतील सोया तेल व सनफ्लॉवर तेल यांचा आयातीत प्रामुख्याने वाटा असतो. या आयातीचे मूल्य 17 अब्ज डॉलर्स आहे. या मोठ्या तफावतीमुळे भारतातील भुईमूग शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे उत्पादन व त्यातील तेलाचा अंश वाढवण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. पिकातील तेलाचा अंश वाढल्यास हे पीक अधिक उत्पन्न मिळवून देते. आणि, अशा रितीने प्रोन्युटिवासोबतच्या सहयोगामुळे गुजरातमधील भुईमूग शेतकऱ्यांना या संधीचा लाभ घेता आला. यूपीएलचे प्रादेशिक संचालक आशीष डोभाल म्हणाले, “यूपीएल इंडियाने सातत्याने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे, शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे मूल्यमापन केले आहे आणि त्यातूनच प्रोन्युटिवा सोल्युशन्स तयार केली आहेत. यूपीएल प्रोन्युटिवा हा एक शाश्वत कार्यक्रम असून, भारतभरातील भुईमूग शेतकऱ्यांसाठी हा आशेचा किरण आहे. 30 टक्के सरासरी उत्पादन वाढ झाल्यास, प्रतिएकर 20 क्विंटल उत्पादन व प्रतिकिलो 44 रुपये किंमत यांच्या आधारे, शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 65000 रुपये मूल्य प्राप्ती होते. 10 लाख हेक्टरवरील भुईमुगाच्या पिकावर यूपीएल प्रोन्युटिवाचा वापर केल्यास भारतीय शेतकऱ्यांना 6500 कोटी रुपयांचे अतिरिक्त मूल्य प्राप्त होईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Farmer, Money

    पुढील बातम्या