औरंगाबाद शांत, अफवांवर विश्वास ठेवू नका!

औरंगाबाद शांत, अफवांवर विश्वास ठेवू नका!

औरंगाबाद शहरामध्ये दोन गटाच्या भांडणातून उसळलेला हिंसाचार आता नियंत्रणात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक सावंत आणि गृहराज्यमंत्री रणजीत पाटील औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत.

  • Share this:

औरंगाबाद, 12 मे : औरंगाबाद शहरामध्ये दोन गटाच्या भांडणातून उसळलेला हिंसाचार आता नियंत्रणात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक सावंत आणि गृहराज्यमंत्री रणजीत पाटील औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत.

दोन्ही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि शहरातल्या सर्व गटांच्या मान्यवरांच्या भेटी घेऊन शांततेचं आवाहन केलं.  इंटरनेट आणि वॉट्सअपच्या माध्यमातून काही समाजकंटक अफवा पसरविण्याचं काम करत असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सरकारनं दिलाय.

खबदारीचा उपाय म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलीसांनी चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. आतापर्यंत 45 जण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झला आहे.

First published: May 12, 2018, 5:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading