पटना, 14 फेब्रुवारी : आज 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) म्हणजेच प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी जिथे प्रेमी आणि प्रेयसी(Lovers)एकत्र जीवन जगण्याची शपथ घेतात. त्याच वेळी, राजधानी पटना (Patna) मधील बेली रोडवरील मधला रस्ता इथे धक्कादायक प्रकार समोर आला. कारण, पत्नीने पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बाईकवरून जाताना पकडलं. एकीकडे बायको तर एकीकडे गर्लफ्रेंड अशी गत नवऱ्याची झाली.
पतीला दुसऱ्या मुलीसोबत पाहिल्यानंतर पत्नीला धक्का बसला. पतीची तर अवस्थाच झाली. रस्त्यावरील गोंधळ पाहून घटनास्थळी रहदारी पोलीस पोहोचले आणि भर रस्त्यात सुरू असलेला वाद संपवला. या सगळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
पोलिसांसमोर पत्नीने आपल्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले. पत्नीचा असा आरोप आहे की, तीन वर्षांपूर्वी दोन्ही कुटुंबांनी भितीने लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत, परंतु लग्नाच्या तीन वर्षानंतर त्याला दुसऱ्या मुलीवर प्रेम जडलं आणि त्याने पत्नीवर राग काढण्यास सुरुवात केली.
इतर बातम्या - जगात येण्याआधीच बाळाचं आयुष्य संपलं, गर्भवती महिलेची बलात्कारानंतर आत्महत्या
पत्नी आणि मुलांना सोडून नवरा गर्लफ्रेंडसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करणार होता
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी व्हॅलेंटाईन डेला पत्नी व मुले सोडून पती प्रेम व्यक्त करण्यासाठी इको पार्क येथे जात होता. वाहतूक पोलिसांच्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा दोघांमध्ये मोठा वाद सुरु होता. त्याच वेळी, आरोपीच्या मैत्रिणीलाही पोलिसांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत.
नवरा-बायकोसह पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस सध्या तिघांची चौकशी करत आहेत. पत्नीच्या लेखी तक्रारीवरून या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे महिला पोलीस स्टेशनचे म्हणणे आहे. प्रथम दोन्ही पक्षांमध्ये समुपदेशन केले जाईल. जर पती-पत्नी दोघांनीही सामंजस्य करार केला तर ते ठीक आहे, अन्यथा पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला जाईल आणि न्याय कलमांमध्ये कायदेशीर कारवाई केली जाईल.
इतर बातम्या - औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या दिलखुलास गप्पा; शरद पवार, उद्धव ठाकरेंवर म्हणाले...