आमच्या कौटुंबिक वादावर कुणी बोललं तर कापून टाकू - तेजप्रताप

आमच्या कौटुंबिक वादावर कुणी बोललं तर कापून टाकू - तेजप्रताप

पक्षात आणि कुटुंबातही आपल्याला दुय्यम वागणूक मिळत असल्याची जाहीर तक्रार तेजप्रताप यांनी केली होती. नंतर अनेक महिने ते अज्ञातवासातही होते.

  • Share this:

पाटना 5 जुलै : लालू प्रसाद यादव तुरुंगात गेल्यानंतर यादव घराण्यात यादवी माजली. त्यांची दोन्ही मुलं तेजप्रताप आणि तेजस्वी यादव यांच्यात मतभेद झाल्याचं पुढं आलंय. तेजप्रतापने  लग्न मोडत दुसरीकडे राहायला गेला त्यामुळे यादव कुटुंबातला कलह जगासमोर आला. आता दोन्ही भावांमध्ये समेट होत असल्याची चिन्ह आहेत. राजदचे नेते तेजस्वी आणि आपल्यात कुठलेही मतभेद नाहीत. काही लोक भांडणं लावण्याचा उद्योग करताहेत. यापुढे तेजस्वीबद्दल कुणी बोललं आणि भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तर कापून टाकू अशी धमकीच तेजप्रताप यादव यांनी दिलीय.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान तेजप्रताप आणि तेजस्वी यादव यांच्यात मतभेद झालेत. पक्षात आणि कुटुंबातही आपल्याला दुय्यम वागणूक मिळत असल्याची जाहीर तक्रार तेजप्रताप यांनी केली होती. नंतर अनेक महिने ते अज्ञातवासातही होते. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाची पूर्ण वाताहत झाली. त्यांना एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे तुरुंगात असलेल्या लालू प्रसाद यादव यांचीही प्रकृती ढासळली आहे.

अर्थसंकल्प नव्हे हा तर 'अनर्थ'संकल्प, धनंजय मुंडेंनी केली खोचक टीका

काय आहे यादव कुटुंबात भांडण?

पत्नीशी घटस्फोट

तेजप्रताप यादव यांच्यामुळे आधीच लालूप्रसाद यादव यांचं कुटुंब अडचणीत आलं आहे. त्यांनी आपल्या पत्नीवर आरोप करून तिच्याशी घटस्फोट घेण्याचा दावा दाखल केला आहे. सोशल मीडियातून ते वारंवार वेगवेगळी वक्तव्य करत असतात. एकीकडे घटस्फोटाचा दावा करायचा आणि दुसरीकडे, मी राधेच्या शोधात आहे, असं म्हणायचं यामुळे ते वादात सापडले होते.

जितेंद्र आव्हाडांचं अनोखं आंदोलन, पोलिस स्टेशनमध्ये आरोपी म्हणून आणले खेकडे

गायी आणि बासरी

याआधी, तेजप्रताप यादव यांनी शंकराचं आणि कृष्णाचं रूप घेतल्यामुळेही ते चांगलेच चर्चेत होते. त्यांनी मथुरेचा दौरा करून कान्हाचं रूप धारण केलं होतं. गायींच्या मध्ये उभं राहून बासरी वाजवतानाचा त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तेजप्रताप यादव यांनी कुरुक्षेत्राचाही दौरा केला होता. त्यांच्या या दौऱ्याचीही जोरदार चर्चा झाली.

तेजप्रताप यादव आता पुन्हा निवडणुकांच्या कुरुक्षेत्रात उतरले आहेत. आपल्या दोन उमेदवारांची नावं घोषित करून त्यांनी राष्ट्रीय जनता दलामध्ये दबावाचं राजकारण करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलामध्ये जोरदार यादवी माजली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 05:43 PM IST

ताज्या बातम्या