बिहार लोकसभा : शत्रुघ्न सिन्हा की मोदींचे हे विश्वासू मंत्री - पाटणा साहिब कोण जिंकणार?

बिहार लोकसभा : शत्रुघ्न सिन्हा की मोदींचे हे विश्वासू मंत्री - पाटणा साहिब कोण जिंकणार?

बिहारमधली पाटणा साहिबची जागा या वेळी दोन दिग्गजांच्या लढतीमुळे लक्षवेधी ठरली आहे.

  • Share this:

पाटणा, 17 मे : बिहारमधली पाटणा साहिबची जागा या वेळी दोन दिग्गजांच्या लढतीमुळे लक्षवेधी ठरली आहे. भाजपशी 'बगावत' करत अभिनेते शत्रुघ्न सिन्हा या वेळी काँग्रेसच्या तिकिटावर ही जागा लढवत आहेत. त्यांच्याशी टक्कर द्यायला भाजपने तितकाच तगडा उमेदवार या मतदारसंघातून दिला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद विरुद्ध शत्रुघ्न सिन्हा हा 'बराबरी का मुकाबला' असल्याची बिहारी राजधानीत चर्चा आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2008 मध्ये पाटणासाहिब हा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून ही जागा भाजपने राखली आहे. भरवशाचा नेता आणि स्टार व्हॅल्यू असलेला उमेदवार म्हणून शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपने 2009 मध्ये इथून उमेदवारी दिली आणि त्यांनी त्यानंतर इथून प्रत्येक निवडणूक जिंकली आहे.

निवडणुकीच्या अगोदरच पक्षावर नाराज होऊन शत्रुघ्न सिन्हांनी काँग्रेसचा हात धरला. काँग्रेसच्या तिकिटावर ते या वेळी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर रविशंकर प्रसाद हे भाजपच्या कोअर कमिटीतले नेते उभे केले गेले. केंद्रात मंत्री असलेले रविशंकर प्रसाद पहिल्यांदाच लोकसभा लढवत आहेत. 1995 पासून ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत आणि त्यानंतर त्यांना पक्षाने दोन वेळा राज्यसभेवर पाठवलं आहे. पण लोकसभेसाठी त्यांची ही पहिलीच उमेदवारी.

SPECIAL REPORT: वाराणसीमध्ये कुणाची हवा?

SPECIAL REPORT : निकालाआधीच मोदींना शह देण्यासाठी काँग्रेसची 'बॅटिंग'!

बख्तियारपुर, दीघा, बांकीपुर, कुम्हरार, पटना साहिब, फतुहा असे 7 विधानसभा मतदासरंघ या लोकसभा मत०१दारसंघात येतात.

जातीचा फॅक्टर महत्त्वाचा

पाटना साहिबमध्ये जातीचा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो. या मतदारसंघात कायस्थ मतदार सर्वाधिक आहेत. शत्रुघ्न आणि रविशंकर प्रसाद दोन्ही उमेदवार कायस्थ जातीचे आहेत. अधिकाधिक कायस्थ मतं आपल्याकडे ओढून घेण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. मोदींच्या नावाने इथे प्रचार केला गेला. त्यामुळे मोदींचा करिश्मा चालला तर भाजपला इथून संधी आहे. याबरोबर बिहारमध्ये भाजपच्या साथीला JDU असल्याने कुर्मी आणि मागास मतदारांचा पाठिंबा NDA ला मिळण्याची शक्यता वाढली आहे.

याउलटर शत्रुघ्न सिन्हांची स्टार व्हॅल्यू कामाला येईल, असं काँग्रेसला वाटतं. शिवाय कायस्थ मतदार शत्रुघ्न यांना मतं देऊ शकतात. मुस्लीम आणि यादव मतं सिन्हा यांना मिळण्याची आशा काँग्रेसला आहे.

First published: May 17, 2019, 8:11 PM IST

ताज्या बातम्या