देश तोडण्याच्या गोष्टी करणारा गर्लफ्रेंडमुळे पोलिसांच्या ताब्यात, वाचा शरजील इमामची 'INSIDE STORY'

देश तोडण्याच्या गोष्टी करणारा गर्लफ्रेंडमुळे पोलिसांच्या ताब्यात, वाचा शरजील इमामची 'INSIDE STORY'

सीएए आणि एनआरसीच्या विरोधात शरजीलच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो आसामला भारतापासून वेगळे करण्याविषयी बोलताना ऐकू येतो.

  • Share this:

पटणा, 30 जानेवारी : देशद्रोहाचा आरोप असलेला JNUचा विद्यार्थी शरजील इमाम(Sharjeel Imam)  याला अटक करण्यात आली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, शरजील इमामच्या गर्लफ्रेंडवर दबाव टाकल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. शरजील इमामला 28 जानेवारीला जहानाबादमधील काको येथून अटक करण्यात आली होती. यापूर्वी, शरजीलच्या शोधात सलग चार दिवस देशाच्या कित्येक भागात छापे टाकण्यात आले.

सीएए आणि एनआरसीच्या विरोधात शरजीलच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो आसामला भारतापासून वेगळे करण्याविषयी बोलताना ऐकू येतो. त्याच्याविरूद्ध देशद्रोहासह विविध कलमांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी झाली शरजील इमामला अटक

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरजीलच्या अटकेच्या दिवशी पहाटे चार वाजता दिल्ली गुन्हे शाखेच्या व बिहार पोलिसांनी शरजीलच्या भावाला ताब्यात घेतले होते. भावाची विचारपूस सुरू असताना शरजीलचा मित्र इम्रान याचा शोध लागला. इम्रानला ताब्यात घेण्यात आले असता चौकशी केली तेव्हा शरजीलच्या प्रेयसीची माहिती मिळाली.

इतर बातम्या - उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जाऊन बाबरी मशीद बांधणार, अबू आझमींच्या मुलाची टीका

यानंतर पोलिसांनी तिला गाठून तिच्यावर दबाव निर्माण केला आणि शरजीलला भेटण्यासाठी तिला सांगितलं. शरजील आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी तिला भेटायला जाताच पोलिसांनी त्याला अटक केली. या कारवाईत स्थानिक पोलिसही दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकासमवेत होते. शरजील इमामला अटक करणार्‍या पोलीस पथकाचे प्रमुख दिल्ली पोलिसांचे डीसीपी गुन्हे शाखा राजेश देव होते.

इतर बातम्या - देशभरात आज CAA विरोधात मोठं प्रदर्शन, राजघाटावर 'एकते'ची मानवी साखळी जोडणार

JNU विद्यार्थी शरजील इमामवर भडकाऊ भाषण केल्याचा आरोप

काही दिवसांआधी शरजील इमामचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो ईशान्यच्या आसाम राज्याला भारताकडून वेगळं करण्याविषयी बोलत असतो. तो म्हणाला की, मुस्लिमांना त्यांची शक्ती दर्शवित त्यांनी किमान एक महिन्यासाठी आसामशी संपर्क तोडला पाहिजे. पण न्यूज 18 या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही.

इतर बातम्या - भाजपला पडणार मोठं खिंडार, नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीने रचला मास्टर प्लान

First published: January 30, 2020, 1:29 PM IST
Tags: Bihar News

ताज्या बातम्या