Home /News /news /

संगमनेरमधून धक्कादायक बातमी, 'त्या' 14 पैकी 4 जणांना कोरोनाची लागण

संगमनेरमधून धक्कादायक बातमी, 'त्या' 14 पैकी 4 जणांना कोरोनाची लागण

नेपाळ येथून संगमनेर येथे आलेल्या 14 व्यक्ती पैकी 4 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिर्डी, 23 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातच आढळले आहे. अशातच शिर्डीमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नेपाळ येथून संगमनेर येथे आलेल्या 14 व्यक्ती पैकी 4 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 37 वर गेली आहे.  4 एप्रिल ला या व्यक्तींना एका इमारतीतून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, 14 दिवसानंतर 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 04 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्व व्यक्तींना संगमनेर येथे संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात आले होते,  या 4 व्यक्तींचा देखरेखीखाली असण्याचा कालावधी संपणार होता. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार होते. हेही वाचा - लॉकडाऊनमुळे असा बदलला भारत, NASA ने शेअर केले सॅटेलाइट PHOTO मात्र, त्यापूर्वी त्यांची चाचणी करण्यात आली. त्यात, 10  व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह तर 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे या व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते. विशेष म्हणजे, 19 एप्रिल रोजी संगमनेर तालुक्यात चारही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. 14 दिवसांनी केलेल्या दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे या रुग्णांना नगरमधून  डिस्चार्जही देण्यात आला होता. हेही वाचा - कोरोनाच्या संकटात दिलासादायक बातमी, मुंबईकरांनी करुन दाखवलं! दरम्यान, बुधवारी रात्री जामखेड येथील दोघा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या जामखेड येथील कोरोनाबाधित रुग्णाची दोन्ही मुले कोरोनाबाधित झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या या दोन युवकांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आज त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. कोरोनाबाधित रुग्णाची जिल्ह्यातील संख्या आता 37 झाली आहे तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 20  झाली आहे. सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये 11 जण उपचार घेत आहेत. तर या कोरोनाबाधित 4 रुग्णांना आता तिथे हलवले जाणार आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या