Good New: रेल्वे स्टेशनवर मिळणार गरमागरम अन्न, पण पाळाव्या लागणार 'या' अटी

Good New: रेल्वे स्टेशनवर मिळणार गरमागरम अन्न, पण पाळाव्या लागणार 'या' अटी

भारतीय रेल्वेने (Indian Railway) प्रवाशांसाठी एक खूशखबर दिली आहे. प्रवाशांना आता रेल्वे स्टॉलवर अन्न मिळणार आहे. पण यासाठी काही नियम पाळणेही आवश्यक आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर: भारतीय रेल्वे (Indian Railway)ने प्रवाशांना एक खूशखबर दिली आहे. प्रवाशांना आता रेल्वे स्टेशनवर गरमागरम आणि ताजं अन्न मिळणार आहे. कोरोनाच्या (Coronavirus) काळात रेल्वे बंद करण्यात आल्या. स्वाभाविकच रेल्वेचे फूड स्टॉलही बंद करण्यात आले. रेल्वे सुरू झाल्या तरी रेल्वे स्टॉल्सवर मिळणारं गरमागरम अन्न विकण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. पण आता रेल्वे स्टेशनवर ताजं अन्न विकण्याची परवानगी रेल्वेने दिली आहे.

सणासुदीच्या काळात लोकांनी मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करायला सुरुवात केली आहे. लांब पल्ल्याच्या गाडीने जाताना प्रवाशांना रेल्वे स्टॉल्सवर जेवण मिळत नव्हतं. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.  या आधी फक्त Packaged food विकण्याची परवानगी रेल्वेने दिली होती. पण लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना ताजं अन्न मिळत नव्हतं.

काय आहेत नियम?

रेल्वे स्टॉल्स, फूड प्लाझा (Food Plaza), जन आहार (Jan Ahar), सेल किचन (Cell Kitchen) मध्ये गरमागरम आणि ताजं अन्न प्रवाशांना विकत घेता येईल. पण त्या जागी बसून किंवा उभं राहून खाण्याची परवानगी मात्र देण्यात आलेली नाही. प्रवाशांना अन्न पार्सल करुन नेता येईल.तसंच प्रवाशंना आणि विक्रेत्यांना स्वच्छतेचं पालन करावं लागे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापरही बंधनकारक असेल.

इंडिअन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिजम कॉर्पोरेशन (IRCTC)ने यासंदर्भात 30 सप्टेंबर रोजी आदेश काढला आहे. ज्या विक्रेत्यांचा करार 23 मार्चनंतर संपला आहे, त्यांनी पैसे भरुन आपला करार पुन्हा सुरू करुन घ्यावा. असं IRCTCच्या आदेशात म्हटलं आहे. पण अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अनेक विक्रेत्यांनी अद्यापही पैसे भरलेले नाहीत. वेंडर्स असोसिएशनने (Vendors association)ने यासंदर्भात रेल्वेला एक पत्र लिहलं आहे. अनेक विक्रेते कोरोनाच्या भीतीमुळे अद्यापही स्टॉल्स सुरू करायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही दबाव टाकू नये. असं या पत्रात लिहलं आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 5, 2020, 10:10 PM IST

ताज्या बातम्या