मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राजस्थानमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि बस एकमेकांना धडकून घेतला पेट, पाच जणांचा होरपळून मृत्यू

राजस्थानमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि बस एकमेकांना धडकून घेतला पेट, पाच जणांचा होरपळून मृत्यू

ट्रक आणि बस एकमेकांना धडकून घेतला पेट; पाच जणांचा होरपळून मृत्यू, भीषण अपघाताचे PHTOTOS

ट्रक आणि बस एकमेकांना धडकून घेतला पेट; पाच जणांचा होरपळून मृत्यू, भीषण अपघाताचे PHTOTOS

Collision between bus and truck, five died: प्रवासी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे.

  • Published by:  Sunil Desale

जयपूर, 10 नोव्हेंबर : प्रवासी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात (bus and truck collision) झाला आहे. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि त्यानंतर गाड्यांनी तात्काळ पेट घेतला. या दुर्घटनेत पाच प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थानमधील (Rajasthan) बाडमेर जिल्ह्यातील पचपदरा येथे हा अपघात झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे तसेच या अपघातातील जखमींना योग्य ते उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी प्रवासी बसमध्ये एकूण 25 प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली आणि त्यानंतर दोन्ही गाड्यांनी पेट घेतला अशी माहिती समोर येत आहे.

पचपदरा येथील आमदार मदन प्रजापत यांनी सांगितले की, बसमधील प्रवासी हे तमिळनाडू, राजस्थान आणि इतर ठिकाणचे होते. या अपघातानंतर 21 जणांना बसमधून बाहेर काढले आहे. बसमध्ये नेमके किती प्रवासी होते याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये.

भरधाव Audi कारने नागरिकांना चिरडले, अंगावर काटा आणणारा अपघाताचा LIVE VIDEO

एका भरधाव ऑडी कारने अनेकांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघाताचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 9 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात राजस्थानमधील जोधपूर येथे घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या भरधाव ऑडी कारने नागरिकांना चिरडले ती गाडी राजस्थानमधील जयपूर येथील रजिस्ट्रेशनची असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताचा व्हिडीओ पाहून अक्षरशः अंगावर काटा येतो. अपघाताचा सीसीटीव्ही पाहून अपघात किती भीषण होता याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. मंगळवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

First published: