शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर पार्थ यांचं भावनिक टि्वट, म्हणाले...

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर पार्थ यांचं भावनिक टि्वट, म्हणाले...

शिखर बँक घोटाळ्यात शरद पवारांचं नाव आल्यानं अजित पवार व्यथित होऊन राजीनामा दिला असावा अशी शक्यता शरद पवारांनी व्यक्त केली.

  • Share this:

पुणे, 27 सप्टेंबर : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा अचानक राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली. अखेर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. त्यानंतर आता पार्थ पवार यांनीही टि्वट करून हा दिवस कठीण होता, अशी भावना व्यक्त केली.

पार्थ पवार यांनी टि्वटमध्ये म्हटलं की, आजचा दिवस माझ्यासाठी खूप भावूक आणि कठीण होता. घरातले कुटुंब प्रमुख शरद पवार यांनी आमच्याशी चर्चा केली. दरम्यान, शरद पवार हे अजितदादांची समजूत घालण्यासाठी मुंबईकडे रवाना झाल्याचं कळतंय.

त्याआधी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट खुद्द शरद पवारांनी केला. राजकारणाच्या खालावलेल्या पातळीमुळे अजित पवार उद्घिग्न झाले असून त्यांनी पार्थ पवारांकडे राजकीय संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचा खुलासा यावेळी पवारांनी केला.

अजित पवारांनी दुसऱ्यांदा तडकाफडकी राजीनामा दिल्यानं संपूर्ण राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली. मात्र, शिखर बँक घोटाळ्यात शरद पवारांचं नाव आल्यानं अजित पवार व्यथित होऊन राजीनामा दिला असावा अशी शक्यता शरद पवारांनी व्यक्त केली. आपल्याला राजीनाम्याबाबत कोणतीही पूर्वकल्पना नव्हती असंही पवारांनी स्पष्ट केलं.अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर कुटुंबात कलह असल्याचं बोललं जात होतं. परंतु, शरद पवार यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत कुटुंबात कोणतेही मतभेद नसून गृहकलह नसल्याचा शरद पवारांनी ठासून सांगितलं.

शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांसह 70 जणांवर गुन्हे दाखल झाल्यानं पवार कुटुंबासमोर अडचणींचा डोंगर उभा ठाकला आहे.

==============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2019 11:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading