• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • पार्थ अजूनही शांतच, श्रीनिवास पवारांच्या घरी पोहोचला पण...

पार्थ अजूनही शांतच, श्रीनिवास पवारांच्या घरी पोहोचला पण...

कण्हेरीत श्रीनिवास पवार यांच्या घरी संपूर्ण पवार कुटुंबिय एकत्र येत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी काण्हेरीत पार्थ पवार पोहोचले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:
पुणे, 15 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. आजोबा शरद पवार यांनी नातवाची कानउघडणी केल्यामुळे पवार कुटुंबात दोन गट पडल्याचं बोललं जात आहे. अशात आज कण्हेरीत श्रीनिवास पवार यांच्या घरी संपूर्ण पवार कुटुंबिय एकत्र येत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी काण्हेरीत पार्थ पवार पोहोचले असल्याची माहिती देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माध्यमांनी पार्थ पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता पार्थने बोलण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. पार्थ पवार यांच्या या नकारामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पार्थ अजूनही नाराज आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारदेखील या बैठकीसाठी जाणार नसल्याचं सांगण्यात आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांत नेमकं काय सुरू आहे हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता जुने सोने आणि दागिने विकताना द्यावा लागणार GST? वाचा सविस्तर दरम्यान, पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सीबीआय चौकशीची मागणी केली होती. एवढंच नाहीतर एकीकडे शरद पवार यांनी राम मंदिराबद्दल वेगळी भूमिका मांडली असताना दुसरीकडे नातवानेच जय श्रीरामचा नारा दिला होता. त्यामुळे अखेर 'नातवाच्या मताला कवडीची किंमत देत नाही, तो अजून अपरिपक्व आहे' असं म्हणत शरद पवारांनी पार्थचे कान उपटले. पण, जाहिररित्या आजोबांनी कानउपटल्यामुळे पवार कुटुंबात दोन गट पडले आहे. दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रवादीत दोन गट पडले असून बहुंताश गट हा शरद पवारांच्या बाजूने आहे. पवार कुटुंबात गोडवा कायम राहावा म्हणून अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी शनिवारी घरातील सर्व सदस्यांसाठी स्नेहभोजन आयोजित केले आहे. मुंबईत लोकल सुरू होण्याबद्दल लवकरच Good News, काँग्रेसच्या नेत्याने दिले संकेत या दोन गटांपैकी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राजेंद्र टोपे, छगन भुजबळ यांच्यासह इतर नेते पवारांच्या बाजूने उभे आहे. पार्थ यांनी वेगळी भूमिका कशी मांडली याबद्दल संपूर्ण माहितीही पवारांच्या कानी घालण्यात आली आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published: