• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO पार्थ पवार पुन्हा वादात, दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या 'फादर'ची घेतली भेट
  • VIDEO पार्थ पवार पुन्हा वादात, दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या 'फादर'ची घेतली भेट

    News18 Lokmat | Published On: Apr 1, 2019 10:23 PM IST | Updated On: Apr 1, 2019 10:23 PM IST

    पुणे, 1 एप्रिल : मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. दापोडीतील विनियार्ड चर्चचे वादग्रस्त फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हवे यांची पार्थ पवारांनी भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. यावरुन आता पुन्हा पार्थ पवार टीकेचे धनी ठरले आहेत. शनिवारी पार्थ यांनी पास्टर डेव्हिडची भेट घेतली होती. तो व्हिडीओ आता व्हायरल झालाय. विशेष म्हणजे यावेळी पास्टर यांनी 'तुझी शक्ती माझ्यात आणि माझी शक्ती तुझ्यात' असे आशीर्वादही दिले. दरम्यान, असाध्य रोगांवर उपचार करत असल्याचा फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हवे दावा करतात. त्यामुळे ते वादग्रस्त ठरले होते. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या धर्म गुरुची भेट घेतल्यानं पार्थ पवारांवर टीका होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी