S M L

#Durgotsav2018 : असंघटित कामगारांसाठी 'एल्गार' पुकारणाऱ्या पारोमिता गोस्वामी

श्रमिक एल्गार या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी असंघटित क्षेत्रातील महिला, आदीवासी, दलित, कामगार, शेतकरी, शेतमजूरांची मोट बांधली.

Ajay Kautikwar | Updated On: Oct 11, 2018 04:19 PM IST

#Durgotsav2018 : असंघटित कामगारांसाठी 'एल्गार' पुकारणाऱ्या पारोमिता गोस्वामी

( नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर करणारा उत्सव. नवरात्रोत्सव म्हणजे नव्या विचारांचं जागरण. नवरात्रोत्सव म्हणजे मांगल्याची सुरूवात. अशा या पवित्र पर्वावर आम्ही तुम्हाला करून देणार आहोत महाराष्ट्रातल्या कर्तृत्वानं महिलांच्या कार्याची ओळख. 'Durgotsav 2018' मधून. या महिलांनी सर्व आव्हानांवर मात करत, संघर्ष करत समाजाला प्रेरणा दिली.)

गडचिरोली : पश्चिम बंगालमध्ये प्रार्थमिक शिक्षण, पुढे दिल्ली, मुंबईत उच्च शिक्षण, अमेरिकेतही काही काळ अभ्यास अशी पार्श्वभूमी असताना पोरोमिता गोस्वामी रमल्या त्या गडचिरोलीतल्या दुर्गम भागात.

श्रमिक एल्गार (स्थापना 2000) या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामामुळं आदिवासींना मोठा आधार मिळालाय.या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी असंघटित क्षेत्रातील महिला, आदीवासी, दलित, कामगार, शेतकरी, शेतमजूरांची मोट बांधली. चंद्रपुर-गडचिरोली जिल्हयात संघटनेचे 25 हजार सभासद. 500 चे वर स्वयंसेवी कार्यकर्ते आहेत.चंद्रपुर जिल्हयात 15 व गडचिरोली जिल्हयात 2 तालुक्यात त्यांनी आपलं काम उभं केलं. या संघटनेच्या माध्यमातुन गंजबसौदा मध्यप्रदेश येथून 167 वेठबिगाराची मुक्तता केली आणि प्रशासनाच्या मदतीने पुर्नवसन. 500 वर कोलाम, गोंड आदीवासीनां त्यांच्या जमिनीचे हक्क मिळवून दिले.

गडचिरोली जिल्हयातील 10 हजारांच्या वर निष्पाप आदीवासी तरूणांकडून नक्षलसमर्थक म्हणून पोलीसांनी भरलेले फॉर्म (सी नोट) रद्द करायला भाग पाडलं. व्यसनमुक्त समाजाची निर्मितीसाठी चंद्रपुर जिल्हयातील दारूचे सर्व परवाने रद्द करून, चंद्रपुर जिल्हयाचे दारूमुक्तीचे आंदोलन.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रात मंजूर झालेल्या कोल माईन्सचे विरोधात चंद्रपूर बचाव संघर्ष समितीसोबत संघर्ष करून पर्यावरण रक्षणासाठी कार्य केलं त्यांच्या या कार्याला आमचा सलाम.

Loading...
Loading...

(शुक्रवारी - रूढी परंपरांविरोधात लढा पुकारणाऱ्या शहनाज शेख यांचा संघर्ष)

 VIDEO #आरोग्याचे नवरंग : उपवासाच्या डाएट टिप्स

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 06:56 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close